आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

‘दिव्य मराठी’ने मांडला होता प्रश्न:विभागीय क्रीडा संकुलात खेळाडूंचे पंचवीस टक्के शुल्क कपात करणार; पालकमंत्री सुभाष देसाईंची प्रस्तावाला मान्यता

औरंगाबाद19 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

गारखेड्यातील विभागीय क्रीडा संकुलात विविध खेळांसाठी येणाऱ्या खेळाडूंच्या मासिक, वार्षिक शुल्कामध्ये प्रशासनाने भरमसाठ वाढ केली होती. त्याला खेळाडूंचा माेठ्या प्रमाणावर विरोध होत होता. ‘दैनिक दिव्य मराठी’ने २ जुलै २०२१ रोजी या विषयी वृत्त प्रकाशित करून खेळाडूंवरील अन्यायाला वाचा फोडली होती.

त्यावेळी पालकमंत्री सुभाष देसाई व जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी शुल्क कमी करण्याचे आश्वासन दिले होते, मात्र त्यावर निर्णय होत नव्हता. अखेर उशिरा का होईना पालकमंत्र्यांनी शुल्कात २५ टक्क्यांपर्यंत कपात करण्याचा निर्णय जाहीर केला.

शुल्क कमी करण्यासाठी तत्कालीन विभागीय क्रीडा उपसंचालक ऊर्मिला मोराळे यांनी ‘एसओपी’ प्रस्ताव सादर करत जिल्हाधिकाऱ्यांमार्फत शासनाकडे पाठवला होता. त्याला पालकमंत्र्यांनी मान्यता दिली.

आंतरराष्ट्रीय खेळाडूला आजीवन शुल्क माफ : नव्या धोरणानुसार, आंतरराष्ट्रीय स्पर्धा खेळलेल्या किंवा पदक विजेत्या खेळाडूला आजीवन शुल्क माफ करण्यात येत आहे. तर राष्ट्रीय स्पर्धांमध्ये पदकविजेत्या खेळाडूला त्याच्या पदकप्राप्तीपासून दोन वर्षे क्रीडा संकुलात शुल्क माफ केले जाणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी चव्हाण यांनी दिली.

बातम्या आणखी आहेत...