आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दिव्य मराठी विशेष:डॉक्टर म्हणाले, सीझर करावे लागेल; महिलेची बसमध्येच प्रसूती; अजिंठा ग्रामीण रुग्णालयात झाली सुखरूप ट्रीटमेंट, दोन तासांत घरी

अजिंठाएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक
  • देवानेच आम्हाला साथ दिली

सोयगाव येथील महिलेची सिल्लोडहून जळगावकडे जात असताना बसमध्येच प्रसूती झाल्याची घटना सोमवारी दुपारी चार वाजता गोळेगाव-बाळापूर रस्त्यावर घडली. आई आणि चिमुकली मुलगी दोन्ही सुखरूप आहेत. सोयगाव येथील किरण मुळे या २२ वर्षीय महिलेस प्रसूतीसाठी सोयगाव येथील डाॅक्टरने सिल्लोडला घेऊन जाण्याचा सल्ला दिला. सिल्लोड येथील सरकारी रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी महिलेची सीझर करावी लागेल अर्जंट औरंगाबादला नेण्याचा सल्ला कुटुंबीयांना दिला. पण शेतकरी आकाश मुळे यांनी औरंगाबादपेक्षा सोयगावपासून जळगाव जिल्हा जवळ असल्याने औरंगाबाद-जळगाव बसने जळगावला जात असताना मध्येच गोळेगाव-बाळापूर रस्त्यावरच महिलेची बसमध्येच प्रसूती झाली आणि तीही नॉर्मल.

बसच्या चालक-वाहकांनी तातडीने या महिलेला अजिंठा ग्रामीण रुग्णालयात आणले. महिला आणि मुलीला येथील वैद्यकीय अधीक्षक डॉ. डी. डी. खंदारे यांच्या मार्गदर्शनाखाली वैशाली सिरसाट, सीमा रायकर अधिपरिचारिका, लक्ष्मी मावशी (दया बाई) रामनाथ बडसल, सुरेश गव्हाणे यांनी व्यवस्थित उपचार करून सदर महिलेला त्यांच्या कुटुंबाच्या सोबत सोयगावला दवाखान्याच्या रुग्णवाहिकेत घरी सोडले. किरण मुळे या महिलेला पहिलीही दोन वर्षांची वैष्णवी नावाची मुलगी आहे. वैष्णवी, पती आकाश, आजी सुमनबाई हे किरणच्या सोबत बसमध्येच होते.

देवानेच आम्हाला साथ दिली
आम्ही सोयगावच्या रुग्णालयात गेलो. त्यांनी सिल्लोडला पाठवले. सिल्लोडला नेले असता अर्जंट औरंगाबादला न्या किरणचे सीझरच करावे लागेल असे सांगितले. आम्ही जळगावकडे जात असताना किरण बसमध्येच प्रसूत झाली. आम्ही गरीब असल्याने देवाने आम्हाला साथ दिली. डॉक्टरने सीझर सांगितले, माझ्या बायकोची नॉर्मल डिलिव्हरी झाली. -किरण मुळे, पती, सोयगाव.

मुलगी, आईला वेगळे केले
या महिलेची बसमध्येच डिलिव्हरी झालेली होती. आम्ही आई आणि मुलीची नाळ वेगळी केली. त्यांच्यावर व्यवस्थित ट्रीटमेंट केली. नॉर्मल डिलिव्हरी झाली. दोघे सुखरूप आहेत. - वैशाली सिरसाट, अधिपरिचारिका, अजिंठा.


बातम्या आणखी आहेत...