आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भूतदया:अपघातात श्वानाचे दोन पाय निकामी झाले; 54 हजार खर्चून तीन युवकांनी अमेरिकेहून मागवली व्हीलचेअर

औरंगाबादएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक
  • पिल्लांसह रस्ता ओलांडताना वाहनाने दिली होती रागिणी श्वानाला धडक

पिल्लांसह रस्ता ओलांडताना रागिणी नावाच्या श्वानाला भरधाव वाहनाने धडक दिली. यात तिचे मागचे दोन्ही पाय निकामी होऊन मणका मोडला. ती रस्त्यावर पडलेली दिसताच आशिष जोशी, आदिनाथ बलाढ्ये व चिन्मय दिवेकर या युवकांनी तिला पशुवैद्यकाकडे उपचारासाठी नेले. तिचा जीव वाचला, पण चालता येत नसल्याचे डॉक्टरांनी सांगितले. युवकांनी ५४ हजार रुपये खर्च करत अमेरिकेहून व्हीलचेअर मागवली.

औरंगाबादेतील काल्डा कॉर्नर भागात रस्ते डांबरीकरणाचे काम सुरू आहे. रस्त्याच्या बाजूला रिकाम्या प्लॉटमध्ये रागिणीने पिल्ले दिली. भल्या पहाटे रस्ता ओलांडताना अज्ञात वाहनाने तिला चिरडले. पहाटे पाचला तिघांना रागिणी पडलेली दिसली. या वेळी तिचे मागचे दोन्ही पाय जमिनीला टेकले होते. आतडेही बाहेर आले होते. या तिघांनी तिला खासगी पशुवैद्यक डॉ. नीलेश जाधव यांच्याकडे दाखल केले.

त्यानंतर डॉ. वल्लभ जोशी, डॉ. डिघुळे यांनी तिच्या पायांवर लेझर ट्रीटमेंट केली आणि तिचा जीव वाचवला. मात्र, ती चालू शकत नव्हती. डॉक्टरांनी व्हीलचेअरचा पर्याय सांगितल्यानंतर तिघांनीही अमेरिकेहून ऑनलाइन व्हीलचेअर मागवली.

बातम्या आणखी आहेत...