आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

परिणाम:पत्नीच्या ब्रेन ट्यूमरच्या औषधींचा खर्च न झेपल्याने चालक पतीच बनला चोर

औरंगाबाद8 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

पत्नीला काही महिन्यांपूर्वी ब्रेन ट्यूमर असल्याचे निदान झाले. त्यामुळे दर महिन्याचा औषधोपचारांचा खर्च झेपत नव्हता. परिणामी, रोजच्या उत्पन्नासोबत अधिकचा खर्च वाढल्याने चालक पतीच चोर बनला. अरुण यशवंतराव कुंटे (४०, रा. राजनगर, मुकुंदवाडी) असे त्याचे नाव असून त्याने चोरलेल्या महागड्या वाहनांच्या १ लाख १८ हजारांच्या बॅटऱ्या, एलईडी पोलिसांनी जप्त केल्या.

मुकुंदवाडीतून विष्णू छगनराय तवार (४९, रा. एन-१२) यांची दोन दिवसांपूर्वी चारचाकी वाहनातून बॅटऱ्या, व्हील कॅप, एलईडी, जॅक चोरीला गेला होता. निरीक्षक ब्रह्मा गिरी यांच्या सूचनेवरून उपनिरीक्षक बाळासाहेब आहेर यांनी तपास सुरू केला. तेव्हा एका खबऱ्याने रामनगर परिसरात चारचाकी वाहनांचे व्हील जॅक विक्रीसाठी एक जण विक्रेत्याचा शोधात असल्याची माहिती मिळाली. आहेर यांनी नरसिंग पवार, बाबासाहेब कांबळे, मनोहर गिते, अनिल थोरे, संतोष भानुसे, गणेश वाघ, श्याम आढे यांनी धाव घेतली. तेव्हा पोलिसांची नजर चुकवून त्याने पळून जाण्याचा प्रयत्न केला. मात्र, पकडल्यानंतर त्याने नाव सांगितले. काही महिन्यांपूर्वीच त्याच्या पत्नीला ब्रेन ट्युमरचा आजार जडला. हवालदार दिगंबर धारबळे तपास करीत आहेत.

बातम्या आणखी आहेत...