आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

चाकूचा धाकावर कार चालकाला लुटले:बायपासवरील प्रकार; पोलिसांनी आवळल्या लुटारूंच्या मुसक्या

औरंगाबाद12 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद-सावंगी बायपास रोडवर लघुशंकेसाठी थांबवलेल्या कार चालकाला चाकूने जीवे मारण्‍याची धमकी देत लुटमार तसेच कारची काच फोडून नुकसान केल्याप्रकरणी एमआयडीसी सिडको पोलिसांनी आणखी एका आरोपीच्‍या मुसक्या आवळल्या. रफिक निजाम शेख असे आरोपीचे नाव असून त्‍याला 18 जूनपर्यंत पोलिस कोठडीत ठेवण्‍योच आदेश प्रथम वर्ग न्‍यायदंडाधिकारी एस.व्‍ही. चरडे यांनी गुरुवार 16 जून रोजी दिले.

कसा घडला प्रकार?

चिकलठाणा परिसरातील पटेलनगरात राहणारे मुसानूर मोहम्मद पटेल (56) हे गुरुवार 16 जून रोजी रात्री सव्‍वा आठ वाजेच्‍या सुमारास सिडको येथून काम आटोपून कारने (क्रं. एमएच-20-ईके-8055) सावंगी बायपास मार्गे घरी परतत होते. वाटेत त्‍यांना लघुशंका आल्याने त्‍यांनी कार बाजूला थांबवली. ते पुन्हा कारकडे जात असताना अचानक एका दुचाकीवर आलेल्या तिघांपैकी एकने चाकू फिर्यादीच्‍या गळ्याला लावून जीवे मारण्‍याची धमकी दिली. तर उर्वरित दोघांनी फिर्यादीच्‍या खिशातील चार हजार चारशे रुपयांची रोख रक्कम हिसकावून घेतली तर एकाने चाकूच्‍या मुठीने कारच्‍या मागील बाजुची काच फोडून नुकसान केले. या प्रकरणात एमआयडीसी सिडको पोलिस ठाण्‍यात गुन्‍हा दाखल करण्‍यात आला.

ऐवज हस्तगत

आरोपीला आज न्‍यायालयात हजर करण्‍यात आले असता, सहाय्यक सरकारी वकील एस.एल. दास यांनी गुन्‍ह्यातील आरोपीने चोरलेला एवेज हस्‍तगत करायचा आहे. आरोपीचा पसार साथीदार सोनू ऊर्फ धांदल्या याला अटक करायची आहे. तसेच गुन्‍ह्यात वापरलेली दुचाकी हस्‍तगत करायची असल्याने आरोपीला पोलिस कोठडी देण्‍याची विनंती न्‍यायालयाकडे केली.

बातम्या आणखी आहेत...