आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कारवाई:उद्योगास डीपी देण्यासाठी अभियंत्याने मागितली 6 लाख रुपयांची लाच

औरंगाबाद10 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

लघुउद्योगासाठी सरकारी योजनेतून विजेची डीपी मंजूर करून तिचा पुरवठा करण्यासाठी जामनेर येथील महावितरणच्या कनिष्ठ अभियंत्याने तब्बल सहा लाख रुपयांची लाच मागितली. तक्रारदाराने याची थेट लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या मुंबई मुख्य कार्यालयात तक्रार केली. त्यावरून अभियंत्यावर औरंगाबाद एसीबीने सापळा लावला. तक्रारदार त्याच्या घरात पैसे घेऊन गेल्यानंतर एसीबीचा सापळा लावल्याचा संशय येताच त्याने तक्रारदार, पंचाला शिवीगाळ करून कार काढून पळ काढला. हेमंत शालिग्राम पाटील (४२) असे त्याचे नाव आहे.

२९ वर्षीय तरुणाची जळगाव जिल्ह्यातील जामनेर तालुक्यात वडिलांची शेतजमीन आहे. त्याच्यावर तरुणाला लघुउद्योग सुरू करायचा होता. २५ केव्हीच्या डीपीसाठी त्याने महावितरणकडे अर्ज केला. नेरी, जामनेरच्या अभियंत्याचा पदभार असलेल्या पाटीलने योजनेअंतर्गत डीपीसाठी सहा लाख रुपयांच्या लाचेची मागणी करून अर्जाची अडवणूक केली. तक्रारदाराने थेट एसीबीच्या मुंबईच्या मुख्य कार्यालयाकडे तक्रार केली.

सबळ पुरावे असल्याने गुन्हा दाखल : एसीबीच्या सापळ्याचा संशय आल्याने पुन्हा पैसे मागणार नाही, असे वाटत असताना पाटीलने जुलै महिन्यात तक्रारदाराच्या नातेवाइकांना संपर्क करून तरुणाला पैसे घेऊन पुन्हा घरीच बोलावले. निरीक्षक सूर्यवंशी यांच्यासह राजेंद्र जोशी, अंमलदार राजेंद्र सिनकर, अशोक नागरगोजे, विलास चव्हाण, चांगदेव बागुल यांनी ५ ऑगस्ट राेजी सापळा रचला. तक्रारदाराला इशारा समजावून सांगून पंच दिला. तक्रारदार रोख रक्कम घेऊन घरात गेला. तेव्हा त्याने लांब उभे राहण्यास सांगून पैशांचे बंडल टेबलवर ठेवण्यास सांगितले. मात्र, पुन्हा संशय आल्याने घराबाहेर येऊन कुणी उभे आहे का, हे पाहू लागला. तुमच्यासोबत कोण आहे, असे विचारून संशय दाट होताच “तुझे काम कसे होते पाहतो,’ अशी धमकी देत तक्रारदार, पंचाला शिवीगाळ केली व वेगात कारमध्ये बसून पळून गेला. पथकाने पाठलाग करण्याचा प्रयत्न केला. मात्र, तो सापडला नाही. चार वेळेस लाच मागितल्याचे सबळ पुरावे असल्याने पथकाने तत्काळ त्याच्याविरोधात जामनेर पोलिस ठाण्यात तक्रार देत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू केली. विशेष म्हणजे, त्याने तरुणाचा अर्ज वरिष्ठांपर्यंत पोहोचू दिला नव्हता.

पैसे घेऊन जामनेरच्या घरी बोलावले, संशय आल्याने निघून गेला मुंबई कार्यालयाने औरंगाबादच्या एसीबी पथकाला कारवाईचे आदेश दिले. अधीक्षक डॉ. राहुल खाडे यांच्या सूचनेवरून पोलिस निरीक्षक शुभांगी सूर्यवंशी यांनी शहानिशा केली असता पाटील लाच मागत असल्याचे निष्पन्न झाले. त्यानंतर पहिला सापळा जून महिन्यात लावण्यात आला. तक्रारदाराला त्याने सहा लाख रुपये घेऊन जामनेरच्या घरी बोलावले. पथकाने सापळा लावला. तक्रारदारासोबत पंच देणे गरजेचे असते. दोघेही घरात गेले. मात्र, पाटीलला संशय आला. तो घराबाहेर गेला व संपूर्ण जामनेरमध्ये कारने फिरत त्या दोघांना घरात बसवून ठेवले. नंतर परतलाच नाही. त्यामुळे तेव्हादेखील तो सापळ्यातून निसटला.

बातम्या आणखी आहेत...