आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

एकतेचा संदेश:धुळवडीचा उत्साह, सप्तरंगांची उधळण अन् चिंब प्रत्येक मन...

छत्रपती संभाजीनगर12 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

जुन्या शहरात गेल्या ५० वर्षांपासून धुळवड वेगळ्या अंदाजात साजरी केली जाते. ट्रॅक्टरमध्ये विविध रंगांनी भरलेले ड्रम ठेवले जातात. गुलमंडी, सिटी चौक, शहागंज, राजाबाजार, पानदरिबा, धावणी मोहल्ला भागात रंग उडवत ही गाडी संस्थान गणपती येथे जाते. सर्व भेदभाव बाजूला सारून सगळ्यांना रंगांत चिंब करण्यासाठी तत्कालीन नेत्यांनी, समाजसेवकांनी ही प्रथा सुरू केली होती. धुळवडीच्या निमित्ताने सगळ्यांनी परस्परांवर रंग उधळत एकतेचा संदेश दिला.

बातम्या आणखी आहेत...