आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

विमा योजना:राजीव गांधी विद्यार्थी अपघात योजनेत कुटुंबाला मिळणार दीड लाख रुपये

औरंगाबादएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक

राजीव गांधी विद्यार्थी अपघात विमा योजनेत मिळणाऱ्या मदत निधीत आता वाढ करण्यात आली आहे. आतापर्यंत या योजनेअंतर्गत मृत्यू झालेल्या विद्यार्थ्यांच्या कुटुंबास ७५ हजार रुपये आर्थिक मदत मिळत होती. आता ही रक्कम दीड लाख रुपये करण्यात आली आहे.

पहिली ते बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी राजीव गांधी विद्यार्थी अपघात विमा योजना आहे. विद्यार्थ्यांचा अपघाती मृत्यू झाल्यास आई हयात नसेल तर वडील किंवा आई-वडील हयात नसल्यास १८ वर्षांवरील भाऊ किंवा अविवाहित बहीण यांच्यापैकी एकाला हे अनुदान दिले जाते. विद्यार्थ्यांचा अपघाती मृत्यू झाल्यास १ लाख ५० हजार रुपये, अपघातामुळे कायमचे अपंगत्व (दोन डोळे किंवा दोन अवयव, एक डोळा किंवा एक अवयव) आल्यास १ लाख रुपये, कायमचे अपंगत्व (एक डोळा किंवा एक अवयव) आल्यास ७५ हजार रुपये, शस्त्रक्रिया करावी लागल्या प्रत्यक्ष रुग्णालयाचा खर्च किंवा कमाल १ लाख रुपये, आजारी पडून, सर्पदंशाने किंवा पोहताना मृत्यू झाल्यास १.५० लाख, कोणत्याही कारणाने जखमी झाल्यास प्रत्यक्ष रुग्णालयाचा खर्च किमान १ लाख रुपये दिले जातील. औरंगाबाद जिल्ह्यात २०२१-२०२२ या शैक्षणिक वर्षात एकूण २८ प्रस्ताव आले होते. त्यापैकी एका विद्यार्थ्याचा मृत्यू झालेला आहे, तर दोन जणांच्या अर्जात त्रुटी आढळून आल्या होत्या. त्या दुरुस्ती करण्यासाठी संधी देण्यात आली आहे, अशी माहिती शिक्षण अधिकाऱ्यांनी दिली.

ही कागदपत्रे आवश्यक
कायमचे अपंगत्व असेल तर डॉक्टरांचे अंतिम प्रमाणपत्र, जिल्हा शल्यचिकित्सकांची प्रमाणपत्रावर स्वाक्षरी असावी, जर अपघाती मृत्यू असेल तर एफआयआरची कॉपी, स्थळ पंचनामा, जिल्हा शल्यचिकित्सकांनी प्रति स्वाक्षरी केलेला मृताचा शवविच्छेदन अहवाल आवश्यक आहे.