आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराशहराच्या नव्या पाणीपुरवठा योजनेचे भवितव्य आज ठरणार आहे. अमृत-२ मध्ये शहरातील तीन महत्त्वाचे उपक्रम घेण्यात आले आहेत. त्यांचे सादरीकरण मनपाचे अधिकारी गुरुवारी (८ डिसेंबर) मुंबईत राज्याच्या मुख्य सचिवांच्या नेतृत्वातील उच्चस्तरीय समितीसमोर सादर करतील. या सादरीकरणानंतर या तिन्ही उपक्रमांचे भवितव्य ठरणार आहे.
प्रामुख्याने शहरासाठी होणाऱ्या नव्या पाणीपुरवठा योजनेचे सादरीकरण असेल. १६८० कोटींची ही योजना २२०० कोटीपर्यंत गेली होती. मात्र, आता या योजनेचे बजेट २७४० रुपये कोटी झाले आहे. बजेट का वाढले हे या सादरीकरणात मांडणार आहोत, असे आयुक्त डॉ. चौधरी यांनी सांगितले. सातारा-देवळाईतील अमृत-२ मध्ये समावेश झालेल्या ड्रेनेज प्रकल्पाचेही सादरीकरण होईल. या प्रकल्पाचा आधीचा डीपीआर २५४ कोटींचा होता. आता अमृत-२ मध्ये समावेश झाल्यानंतर त्याचे बजेट २७५ कोटींवर गेले आहे. यश इनोव्हेशन या प्रकल्प सल्लागार संस्थेच्या माध्यमातून हा डीपीआर बनवण्यात आला. याशिवाय कमल तलावाच्या नूतनीकरणाच्या प्रस्तावाचेही सादरीकरण केले जाईल.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.