आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

रक्तदान दिन:या 5 रक्तदात्यांच्या मदतीची भावना देईल अनेकांना प्रेरणा ; वयाच्या 18 व्या वर्षापासून रक्तदान

औरंगाबाद19 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

रक्ताचा तुटवडा भरून काढण्यासाठी काही मोजकी माणसे नियमित रक्तपेढीत येऊन रक्तदान करतात. कोणी समाजाचे देणे लागतो म्हणून, तर कोणी गरजवंतांसाठी आणि काही जण आपले विशिष्ट रक्तगट असल्याने या चळवळीत योगदान देत असतात. त्यापैकी पाच जणांची माहिती १४ जून या जागतिक रक्तदान दिनानिमित्त करून देत आहोत. वयाच्या १८ व्या वर्षापासून ६० व्या वर्षानंतरही रक्तदान करणारे हे दाते अनेकांना प्रेरणा देऊ शकतील. यातील मनोज छाबडा २००५ पासून दरवर्षी शिबिरांचे आयोजन करतात. त्यांच्या १७ शिबिरातून २००० दाते तयार झाले.

अनुभवातून बनले दाता जटवाड्यातील रहिवासी सुमीत पंडित यांच्या पत्नीला २०१३ मध्ये रक्ताची गरज भासली. त्या वेळी आलेल्या अनुभवातून त्यांनी रक्तदान करणे सुरू केले. आतापर्यंत त्यांनी ५७ वेळा रक्त दिले. इतरांना प्रेरित करण्यासाठी ते वर्षातून चारदा शिबिरांचे आयोजन करतात. औरंगाबाद, जळगावातील ३२ शिबिरातून १५ हजार जणांनी रक्तदान केले.

थॅलेसेमियाग्रस्त मुलांना करतात मदत ओ पॉझिटिव्ह रक्तगट असलेले व्यावसायिक सुनील काला यांनी वयाच्या १८ वर्षांपासून ६० वर्षापर्यंत ९८ वेळा रक्त दिले. वर्षातून तीन ते चार वेळा ते रक्त देतात. थॅलेसेमिया आजाराने ग्रस्त असलेल्या मुलांना त्यांची मोठी मदत झाली आहे.

ओ निगेटिव्ह... मदतीसाठी नेहमीच पॉझिटिव्ह शिवाजीनगरातील कृष्णा धोंडोपंत कुलकर्णी दत्ताजी भाले रक्तपेढीत कार्यरत आहेत. त्यांचा ओ निगेटिव्ह रक्तगट खूपच दुर्मिळ. त्यांनी २५ व्या वर्षी रक्तदान केले. वयाची ५५ वर्षे गाठेपर्यंत १०८ वेळा रक्त दिले. शिबिरांमध्येही ते हिरीरिने सहभागी होतात. दत्ताजी भाले रक्तपेढी आणि जायंट्स ग्रुप, राज्य रक्त संक्रमण परिषद महाराष्ट्र राज्यतर्फे त्यांना गौरवण्यात आले आहे.

प्लेटलेटचेही दाते आपण समाजाचे काही देणे लागतो या भावनेतून वेरूळचे रहिवासी, घृष्णेश्वर मंदिरातील पुरोहित योगेश टोपरे २० वर्षांपासून शिवरात्र, सोमवारी रक्तदान करतात. त्यांचा रक्तगट बी-निगेटिव्ह आहे. घृष्णेश्वर गणेश मंडळात पहिल्यांदा त्यांनी रक्तदान केले. आतापर्यंत रक्तदानासोबत प्लेटलेटही दिल्या आहेत. १६० पेक्षा अधिक शिबिराचे आयोजन केले आहे.

बातम्या आणखी आहेत...