आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराडॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात उद्या 3 डिसेंबरपासून सुरू होणाऱ्या राज्य आंतर विद्यापीठ क्रीडा महोत्सवासाठी तयारी करण्यात आली आहे. या स्पर्धेसाठी राज्यातील 20 विद्यापीठाचे खेळाडू शहरात डेरे दाखल झाले आहेत. यात 2 हजार पेक्षा अधिक खेळाडू मैदानात उतरणार असल्याची माहिती प्रभारी क्रीडा संचालक डॉ. दयानंद कांबळे यांनी दिली.
शनिवारी ऑलिम्पियन धनराज पिल्ले, केंद्रीय अर्थराज्य मंत्री डॉ. भागवत कराड, राज्याचे क्रीडामंत्री गिरीष महाजन यांच्या प्रमुख उपस्थिती विद्यापीठ परिसरात सायंकाळी 5 वाजता उद्घाटन होणार आहे. पाच दिवस चालणाऱ्या या स्पर्धेत अॅथलेटिक्स, बास्केटबॉल, व्हॉलीबॉल, कबड्डी, खो-खो या खेळांचा समावेश आहे. स्पर्धा साखळी व बाद पद्धतीने खेळवली जाणार आहे. स्पर्धेसाठी सर्व मैदाने सुसज्ज झाली आहेत.
क्रांती चाैकातून आज निघणार ‘क्रीडा मशाल रॅली’
क्रीडा महोत्सवाच्या निमित्त आयोजित करण्यात आलेली क्रीडा मशाल रॅली क्रांती चौक ते विद्यापीठदरम्यान सकाळी 9 वाजता निघणार आहे. डॉ.संदीप जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली या रॅलीचे नियोजन केले आहे. यावेळी हजारो खेळाडू, क्रीडा शिक्षक, प्रशिक्षक, मार्गदर्शक, विद्यार्थी, नागरिकांसह कुलगुरु डॉ. प्रमोद येवले, प्र-कुलगुरु डॉ.श्याम शिरसाठ, कुलसचिव डॉ.भगवान साखळे, प्रभारी क्रीडा संचालक डॉ.दयानंद कांबळे, शारीरिक शिक्षण विभागप्रमुख डॉ.कल्पना झरीकर आदींची प्रमुख उपस्थिती राहणार आहे.
नियोजित यंत्रणा सज्ज :
क्रीडा महोत्सवाच्या यशस्वीतेसाठी राज्यपाल नियुक्त निरीक्षण वित्त व भाग्यचक्र समिती तसेच विविध 30 समित्या नियुक्त करण्यात आल्या आहेत. ज्यात स्वागत, निवास, भोजन, वित्त, खेळनिहाय मैदान, पात्रता तपासणी, खेळांच्या तांत्रिक बाबींकरिता राज्य संघटनेमार्फत पात्र पंच अशा एकानेक सामित्यांचे गठन करुन कार्यभाराचे सुत्रबध्द नियोजन करण्यात आले आहे. तसेच अॅथेलेटिक्स खेळाच्या मैदानाचे आधुनिकीकरण/ सिंथेटिक ट्रॅक पायाभरणी कामाचे भूमिपूजन करण्यात येणार आहे. बास्केटबॉल मैदानाची उच्च दर्जाची रंगरंगोटी व नवीन बोर्ड, रिंग व पोलच्या स्ट्रकचरची उभारणी व देखभार करण्यात आली आहे. व्हॉलीबॉल व खो-खो मैदानाचे नव्याने दुरुस्ती देखील केली आहे. स्पर्धेमध्ये कबड्डी खेळांचे सामने हे मॅटवर खेळवले जातील.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.