आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराएमजीएम मैदानावर सुरू असलेल्या आयकॉन चषक क्रिकेट स्पर्धेत शनिवारी झालेल्या उपांत्य फेरीत गव्हर्नमेंट ऑफिसर्स संघाने गव्हर्नमेंट कॉन्ट्रॅक्टर संघावर ४६ धावांनी आणि क्रेडाई संघाने जीएसटी ऑफिशियल्स संघावर ६ गडी राखून दणदणीत विजय मिळवत दिमाखात अंतिम फेरीत धडक मारली. आता सोमवारी गव्हर्नमेंट ऑफिसर्स आणि क्रेडाई या दोन संघांत विजेतेपदाची झुंज रंगणार आहे. आज झालेल्या उपांत्य फेरीच्या लढतीत जयेश नरवडे आणि कैलाश शेळके यांची कामगिरी निर्णायक ठरली. आज झालेल्या पहिल्या उपांत्य फेरीच्या सामन्यात जीएसटी ऑफिशियल्स संघाने १५ षटकांत ६ बाद १०८ धावा फटकावल्या.
त्यांच्याकडून श्याम कदम याने १४ चेंडूंत ३ षटकारांसह २८, त्र्यंबक बहुरेने २२, ज्ञानेश्वर दिंडेने १५ व कर्णधार जी. श्रीकांत यांनी १४ धावांचे योगदान दिले. क्रेडाई संघाकडून प्रतिक अग्रवालने ३७ धावांत २ तर जयेश नरवडे व अखिल भालेकर यांनी प्रत्येकी १ गडी बाद केला. प्रत्युत्तरात पहिले तीन फलंदाज २५ धावांत तंबूत परतल्यानंतर जयेश नरवडे याने राहुल तोबरे याच्या साथीने ३६ चेंडूंत ४३ आणि गोपेश यादव (०४) याच्या साथीने १९ चेंडूंत ४३ धावांची भागीदारी करीत क्रेडाई संघाच्या विजयावर शिक्कामोर्तब केले. जयेश नरवडे याने ३५ चेंडूंत ७ चौकार व एका षटकारासह ५५ धावांची विजयी खेळी केली. त्याला साथ देणाऱ्या राहुल तोबरेने २४ धावा केल्या. जीएसटी ऑफिशियल्सकडून कर्णधार व जीएसटीचे सहआयुक्त जी. श्रीकांत यांनी १७ धावांत २ तर संतोष राजपूत आणि गणेश शिरसवाल यांनी प्रत्येकी १ गडी बाद केला.
उपांत्य फेरीच्या सामन्यात गव्हर्नमेंट ऑफिसर्सने १५ षटकांत ९ बाद १५० अशी तुल्यबळ धावसंख्या उभी केली. त्यांच्याकडून विठ्ठल गाडेकरने २३ चेंडूंत ४०, प्रदीप चव्हाणने २५ धावा काढल्या.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.