आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

खेळता खेळता तोल गेला अन् विहिरीत पडला:अग्निशमन विभागाने अवघ्या 10 मिनिटात बाहेर काढून मुलाचा जीव वाचवला; पाहा VIDEO

औरंगाबाद8 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

खेळता खेळता अचानक तोल गेल्याने 14 वर्षीय मुलगा खोल विहिरीत पडल्याची घटना शुक्रावारी (23 सप्टेंबर) दुपारी औरंगाबाद शहरात घडली. सदरील घटनेची माहिती अग्निशमन विभागाला कळवण्यात आली. अग्निशमन विभाग घटनास्थळी दाखल होऊन मुलाला वाचवण्यात त्यांना यश आले आहे.

काय आहे घटना ?

मिळालेल्या माहितीनुसार, शहरातील दिशा नगरीच्या गोल्डन आर्च सोसायटीमध्ये राहणार 14 वर्षीय स्वप्नील राठोड हा दुपारी 12 वाजेच्या सुमारास बाहेरील परिसरात खेळत होता. झाले असे की, स्वप्नील हा घराकडे असलेल्या विहिरीजवळ गेला. मात्र, खेळतांना त्याचा तोल गेल्याने तो विहिरीत पडला. खोल विहिरीत पडल्याने त्याने मदतीसाठी आवाज दिला पण, त्याचा आवाज कोणापर्यंत पोहोचला नाही. जीव वाचवण्यासाठी स्वप्नीलने आरडाओरड केली मात्र त्याची हाक कोणाला ऐकू आली नाही. बाजूने जाणाऱ्या एकाने स्वप्नीलची हाक ऐकली व अखेर या घटनेची माहिती तात्काळ अग्निशमन विभागाला देण्यात आली. अग्निशमन विभाग घटनास्थळी दाखल होऊन या 14 वर्षीय मुलाला अवघ्या 10 मिनिटात विहिरातून बाहेर काढून त्याचा जीव वाचवला.

कुटुंबियांनी मानले आभार

अग्निशमन विभागाचे उप अग्निशमन आधिकारी एस जे घाटेशाही, ड्युटी ऑफिसर हरिभाऊ घुगे, अग्निशामक छगन सलामबाद, प्रसाद शिंदे, दिनेश वेलदोडे, मोहम्मद मुजफ्फर, सुभाष दुधे, शेख समीर यांच्या पथकाने धाव घेतली. तो पर्यंत स्वप्नीलने पाईपाला लटकून होता. अग्निशमन विभागाच्या जवानांनी दोरी व इतर साहित्याच्या मदतीने विहिरीत उतरत स्वप्नीलला सुखरूप वर काढले. अवघ्या 10 जवानाच्या प्रतिसादाने स्थानिकांनी त्यांचे कौतुक केले. स्वप्नील च्या कुटुंबाने देखील जवानांचे आभार मानले .