आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पहिला रिंगण सोहळा!:संत नामदेव महाराजांच्या पालखीचा रामलीला मैदानावर पहिला रिंगण सोहळा!

औरंगाबाद11 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

नरसी नामदेव येथील संत नामदेव महाराजांच्या पालखीचे रविवारी (दि. १९ ) हिंगोली येथील नांदेड नाका भागात अग्रसेन चौकाजवळ बँड, ढोल-ताशाच्या गजरात जल्लोषात स्वागत करण्यात आले. या वेळी पालखीवर पुष्पवृष्टी करण्यात आली. या वेळी शेकडो भाविकांची उपस्थिती होती. शहरातील प्रमुख मार्गावरून ही पालखी रामलीला मैदानावर दुपारी चार वाजेच्या सुमारास पोहोचली. लोकेश चैतन्य महाराज यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.

त्यानंतर दुपारी चार वाजता रामलीला मैदानावर पहिला रिंगण सोहळा पार पडला. हा सोहळा वारकऱ्यांच्या डोळ्यांचे पारणे फेडणारा ठरला.

बातम्या आणखी आहेत...