आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

2 कोटींचे करणार संकलन:वर्षभरात लायन्स क्लब शहरात सुरू करणार राज्यातील पहिली शैक्षणिक संस्था

औरंगाबाद / रोशनी शिंपी2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

लायन्स क्लब ऑफ औरंगाबादअंतर्गत असलेल्या १८ क्लबच्या माध्यमातून शहरात आय हाॅस्पिटल, बालसदन, ब्लड बँकसोबतच विविध सेवाभावी उपक्रम राबवण्यात आले. आता लायन्सने शिक्षणाकडे मोर्चा वळवला आहे. याकरिता १५ दिवसांपूर्वी लायन्स इंटरनॅशनलने ८५ हजारांचा निधी देऊन मंजुरीही दिली आहे. ही राज्यातील लायन्सची पहिली शाळा ठरणार आहे. लायन्स क्लबच्या विभागीय परिषदेला शनिवारी शहरात सुरुवात झाली. प्रांतपाल पुरुषोत्तम जयपुरिया यांनी परिषदेचे उद्घाटन केले. या वेळी शैक्षणिक संस्थेची अधिकृत घोषणा करण्यात आली.

लायन्स गेली अनेक वर्षे शहरात विविध सामाजिक उपक्रम राबवते. यामध्ये लायन्स आय हॉस्पिटलचे योगदान लक्षणीय आहे. याशिवाय मागील ४३ वर्षांपासून अखंडपणे सुरू असलेल्या मोफत प्लास्टिक सर्जरी शिबिरातून हजारोंना नवजीवनही दिले आहे. या शैक्षणिक संस्थेत बालवाडी ते पदवीपर्यंतचे शिक्षण दिले जाईल. लायन्सचा हा महत्त्वाकांक्षी प्रकल्प असेल. वर्षभरात हा प्रकल्प आकार घेण्यास सुरुवात करेल, असे प्रांतपाल पुरुषोत्तम जयपुरिया यांनी सांगितले. आगामी काळात लायन्सच्या प्रकल्पांत वाढ व्हावी या दृष्टीने काम करणे गरजेचे आहे, असेही ते म्हणाले.

आज जीवनगौरव पुरस्कारांचे वितरण लायन्स प्रकल्पांत उल्लेखनीय योगदान दिलेल्या सहकाऱ्यांना विविध पुरस्कारांचे वितरण तसेच विशेष जीवनगौरव पुरस्कारही रविवारी प्रदान केले जाणार आहेत.

राज्यातील पहिली शैक्षणिक संस्था विविध सामाजिक कामे लायन्सने केली. आता शैक्षणिक संस्थेच्या माध्यमातून नैतिक मूल्ये रुजवण्यासाठी काम करणार आहे. राज्यातील हा पहिलाच प्रकल्प आहे. राहुल औसेकर, विभागीय अध्यक्ष

बातम्या आणखी आहेत...