आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बीएड प्रवेश प्रक्रिया:उद्या बीएड प्रवेशाची पहिली गुणवत्ता यादी जाहीर होणार

औरंगाबाद10 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

बीएड प्रवेश प्रक्रियेचा वेग अजूनही मंदावलेला नाही. सुरुवातीला १० नोव्हेंबरपर्यंत ऑप्शन फॉर्म भरण्याची मुदत हाेती. ती वाढवून १२ नोव्हेंबर केली. आता ऑप्शन भरण्याची प्रक्रिया पूर्ण झाली असून, २१ नोव्हेंबर रोजी पहिल्या फेरीसाठीची गुणवत्ता यादी जाहिर हाेणार असून २२ नोव्हेंबर रोजी जागांचे वाटप हाेइल, अशी माहिती सीईटी सेलने दिली. बीएड प्रवेश प्रक्रिया यंदा लांबणीवर पडली आहे. २०२२-२०२३ शैक्षणिक वर्षातील विविध अभ्यासक्रमांची प्रवेश प्रक्रिया सुरू आहे. मात्र, बीएड अभ्यासक्रमाच्या प्रक्रियेला विलंब हाेत आहे. सीईटी सेलने प्रवेशासाठी वेळापत्रक जाहीर केले. परंतु, ते पाळले नाही. २३ ते २५ या कालवधीत विद्यार्थ्यांना ज्या महाविद्यालयात प्रवेश मिळाला आहे, तो प्रवेश निश्चित करायचा आहे.

बातम्या आणखी आहेत...