आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

हिंगोली:सेनगाव तालुक्यात पहिल्याच पावसाने दाणादाण, झाडे उन्मळली, घरावरील टीन पत्रही उडाली

हिंगोलीएका वर्षापूर्वीलेखक: प्रतिनिधी
  • कॉपी लिंक

हिंगोली जिल्ह्यातील सेनगाव तालुक्यामध्ये अवकाळी पावसाने ग्रामीण भागात चांगलीच दाणादाण उडवून दिली आहे. रविवारी वादळी वाऱ्यासह झालेल्या पावसामुळे अनेक ठिकाणी झाडे उन्मळून पडली तर घरावरील पत्रे उडून गेले आहेत. त्यामुळे ग्रामीण भागातील जनजीवन विस्कळित झाले आहे

सेनगाव तालुक्यात सायंकाळी वादळी वाऱ्यासह पाऊस सुरू झाला. यामुळे आजेगाव येथील एका वेल्डिंगचे दुकानाचे टीन पत्रे उडून गेली . तसेच हाताळा, धनगरवाडी यासह परिसरातील गावांमध्ये घरावरील पत्रे उडून गेल्यामुळे मोठे नुकसान झाले आहे. धनगरवाडी येथे पुलाच्या बांधकामावर असलेल्या मजुरांच्या घरावरील पत्रे उडाल्यामुळे मजुरांची चांगलीच तारांबळ उडाली. विजेचे खांब पडल्यामुळे ग्रामीण भागातील वीज पुरवठा विस्कळित झाला होता.  काही ठिकाणी मात्र जोरदार पाऊस झाल्याने शेतात मोठ्या प्रमाणावर पाणी साचल्याचे चित्र होते. या पावसामुळे वातावरणात गारवा निर्माण झाला असला तरी अनेक ठिकाणी घरांचे मात्र मोठे नुकसान झाले आहे. हाताळा व परिसरातील गावात पाऊस थांबल्यानंतर घरावरील उडून गेली टीनपत्रे गोळा करण्यासाठी गावकऱ्यांची चांगली धावपळ झाली. टीनपत्रावरून किरकोळ स्वरूपाचे वादही झाले आहेत. हिंगोली, कळमनुरी  शहरासह परिसरातही हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस झाला आहे.

बातम्या आणखी आहेत...