आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

लसीकरण:हिंगोलीत टाळ्यांच्या कडकडाटात कोविडचे पहिले लसीकरण, शासकिय रुग्णालयात अधिकाऱ्यांची उपस्थिती

हिंगोली7 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • हिंगोलीच्या शासकिय रुग्णालयात तसेच कळमनुरी येथील उपजिल्हा रुग्णालयात या दोन ठिकाणीच लसीकरण करण्याचे नियोजन करण्यात आले होते.

हिंगोली येथील शासकिय रुग्णालयात शनिवारी ता. १२ सकाळी आकरा वाजण्याच्या सुमारास टाळ्यांच्या कडकडाटात कोविडचे पहिले लसीकरण करण्यात आले. यावेळी अधिकाऱ्यांची उपस्थिती होती.

हिंगोलीच्या शासकिय रुग्णालयात तसेच कळमनुरी येथील उपजिल्हा रुग्णालयात या दोन ठिकाणीच लसीकरण करण्याचे नियोजन करण्यात आले होते. लसीकरण केंद्र फुलांनी सजविले होते. आज सकाळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उदघाटन केल्यानंतर आकरा वाजण्याच्या सुमारास शासकिय रुग्णालयातील बालरोगतज्ञ डॉ. दीपक मोरे यांना अधिपरिचारीका कलावती राठोड यांनी कोविडची पहिली लस दिली. तयावेळी टाळ्यांचा कडकडाट करण्यात आला. यावेळी जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी, जिल्हा परिषदेेचे मुख्यकार्यकारी अधिकारी राधाबिनोद शर्मा, पोलिस अधिक्षक राकेश कलासागर, जिल्हा शल्यचिकीत्सक डॉ. राजेंद्र सुर्यवंशी, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. शिवाजी पवार, डॉ. गोपाल कदम यांच्यासह वैद्यकिय अधिकाऱ्यांची उपस्थिती होती. त्यानंतर नर्सींग महाविद्यालयाच्या प्राचार्या रमा गिरी, इमाचे पदाधिकारी स्नेहल नगरे यांना लसीकरण करून अर्धातास पर्यवेक्षणाखाली ठेवण्यात आले. या ठिकाणी ८० जणांना लसीकरण करण्याचे नियोजन आहे.

तसेच कळमनुरी येथील उपजिल्हा रुग्णालयात प्रभारी वैद्यकिय अधिक्षक डॉ. आनंद मेने यांना अधिपरिचारीका प्रियांका शिरसाट यांनी पहिली लस दिली. यावेळी आरोग्य विभागाचे अधिकारी उपस्थित होते. दिवसभरात शंभर जणांना लसीकरण करण्याचे नियोजन करण्यात आले असल्याचे डॉ. मेने यांनी सांगितले.

बातम्या आणखी आहेत...