आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अंबादास दानवे म्‍हणाले:पूरग्रस्तांना शिंदे सरकारने हवेत सोडले, लोकांच्या जीवनमरणाचा प्रश्न, तरीही फेकाफेकी सुरू

औरंगाबाद22 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

ग्रामविकासमंत्री गिरीश महाजन यांनी सिन्नरला पूरग्रस्त भागाची पाहणी करत दोन दिवसांत मदतीची घोषणा केली खरी; मात्र मदत तर सोडाच, परंतु दोन दिवसांत साधे पंचनामेही झालेले नाहीत. लोक फक्त देवाच्या भरवशावर जगत आहेत. शिंदे सरकारने पूरग्रस्तांना हवेत सोडले, अशी टीका विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी केली

दानवे सोमवारी नाशिक दौऱ्यावर होते. त्यांनी वंजारवाडी, सिन्नरला पाहणी केल्यानंतर सांगितले की, सरकार प्रभावी काम करीत नसून त्यांचा प्रशासनावर वचक नाही. त्यामुळे पूरग्रस्तांना कोणतीही तातडीची मदत मिळाली नाही. पूरग्रस्तांचे संसार उघड्यावर आले आहेत. त्यांच्याकडील जीवनावश्यक वस्तू वाहून गेल्या आहेत. त्यांच्यासमोर जीवनमरणाचा प्रश्न उभा असताना सरकार फक्त आश्वासने फेकत आहे.

उद्धव सेनेचा दसरा मेळावा शिवाजी पार्कवरच होणार असल्याचे दानवे यांनी सांगितले. दरम्यान, ग्रामविकासमंत्री महाजन यांच्या दौऱ्याकडे राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार माणिकराव कोकाटे यांनी पाठ फिरवली होती. त्या वेळी कोकाटे राजकीय विरोधामुळे आले नसावेत, असे म्हटले गेले. पण दानवेंच्या दौऱ्यावेळीही ते फिरकले नाहीत. म्हणून उलटसुलट चर्चा होत आहे.

बातम्या आणखी आहेत...