आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करास्त्रियांचा शृंगार बांगड्यांशिवाय पूर्ण होऊच शकत नाही. बदलत्या काळातही बांगड्यांची फॅशन वाढतच आहे. कुठलाही मंगल प्रसंग असला की स्त्रिया साडी, ड्रेसनुसार मॅचिंग बांगड्या खरेदी करतात. लाखेच्या लखलखणाऱ्या बांगड्यांना महिलांची पसंती असते. सिटी चौकातील मणियार कुटुंब गेल्या ९० वर्षांपासून लाखेच्या बांगड्या तयार करत असून त्यांची चौथी पिढी आज या व्यवसायात आहे.
राजस्थानमधील लाखेच्या बांगड्यांना पूर्वीपासून चांगली मागणी आहे. गुलाब बश्क मणियार हे राजस्थानात बांगड्या तयार करत. व्यवसाय वाढवण्यासाठी ते वयाच्या २५ व्या वर्षी १९३२-३३ या काळात शहरातील शहागंज भागात आले. सुरुवातीला गोटा वर्क म्हणजेच चांदीचे वर्क असलेल्या बांगड्यांना चांगली मागणी होती. यानंतर त्यांनी लाखेपासून बांगड्या तयार करण्यास सुरुवात केली. त्यांच्या पश्चात सलामोद्दीन, नसीरमोद्दीन आणि आता नदिमोद्दीन मणियार हा व्यवसाय करत आहेत. सध्या सिटी चौक परिसरात मणियार कुटुंबातील सात सदस्य लाखेपासून आकर्षक बांगड्या तयार करत आहेत.
अशा तयार होतात बांगड्या लाखेच्या बांगड्यांसाठी लागणारे मटेरियल जोधपूर, पाली येथून आणि स्टोन जयपूरवरून मागवले जातात. लाख तयार करण्यासाठी चपडा, बेरजा यात मार्बल पावडर टाकून ती एकत्रित केली जाते. काहीसे गरम असलेले मिश्रण बांगडीवर लावून त्यावर स्टोन लावून आकर्षक-लखलखणाऱ्या बांगड्या तयार केल्या जातात. शहरातील मकबरा, पाणचक्की तसेच वेरूळ, अजिंठा, शिर्डी येथे या बांगड्यांना विशेष मागणी असते. त्यांची किंमत प्रतिडझन १०० रुपये ते ३ हजार रुपयांपर्यंत आहे.
बांगड्यांवर फोटो, नावाची क्रेझ आमचे पणजोबा शहागंज भागात येऊन लाखेच्या बांगड्या तयार करत होते. आज चौथी पिढी या व्यवसायात आहे. बांगड्यांवर स्वत:चे फोटो आणि नाव, त्यासोबतच पेन सिग्नेचरची क्रेझ वाढत आहे. - नदिमोद्दीन मणियार, बांगडी व्यावसायिक
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.