आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दोघींना वाचवले:तिसगाव नदीच्या पुरात मुलगी वाहून गेली ; हर्सूल तलाव 100 टक्के भरला

औरंगाबाद21 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

शहरात रविवारी दुपारी १.३० ते सायंकाळी ५.३० वाजेपर्यंत टप्प्याटप्प्याने हलका ते धुवाधार पाऊस पडला. एकूण १३.७ मिमी पाऊस पडल्याची नोंद चिकलठाणा व एमजीएम विद्यापीठ वेधशाळेने घेतली आहे. तिसगाव परिसरातील नदीला पूर आल्याने एएस क्लबजवळील पात्रात कपडे धुण्यासाठी गेलेली एक महिला व दोन मुली पुरात अडकल्या. त्यापैकी दोघींचा जीव वाचवण्यात यश आले. एक मुलगी वाहून गेली. बचावासाठी गेलेला एक पोलिस कर्मचारीदेखील जखमी झाला आहे. हर्सूल तलाव १०० टक्के भरला असून दुपारनंतर सांडव्यातून पाणी वाहू लागले आहे.

हर्सूल तलाव भरल्यामुळे खाम व सुखना नदीला पाणी आले आहे. तिसगावच्या नदीला अचानक पूर आल्याने १४ वर्षांची राधा नावाची मुलगी वाहून गेल्याची दुर्दैवी घटना घडली. तर नितू जोगराना (२०), हिराबाई जोगराना (४०) व पोलिस कर्मचारी किशारे गाढे यांना वाचवण्यात यश आले. पुढील पाच दिवस मुसळधार : मान्सूनचा पाऊस पुन्हा एकदा सक्रिय झालेला आहे. परिणामी पुढील पाच दिवस जोरदार ते मुसळधार पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.

हर्सूल तलावात ३१ फूट पाणीसाठा, खाम नदीला पुराची भीती
मागील दहा दिवसांत झालेल्या जोरदार पावसामुळे हर्सूल तलावात ३१ फूट पाणीसाठा (१०० टक्के) झाला आहे. रविवारी दुपारपासून तलावाच्या सांडव्यातून पाणी वाहण्यास सुरुवात झाली. पाच दिवसांत पावसाचा जोर वाढल्यामुळे तलावातील पाणीपातळी सहा फुटांनी वाढली होती. आता पावसाचा जाेर वाढल्यास खाम नदीला पूर येऊ शकताे.

बातम्या आणखी आहेत...