आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराराज्यसभेत भाजपने तीन खासदार निवडून आणले. देवेंद्र फडणवीस हे राजकीय ‘शतरंजचे बादशहा’ आहेत. उत्तम खेळी करत त्यांनी काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेनेला हरवले. आता विधान परिषदेलाही तोच डाव पुन्हा खेळणार नाही, तर नवे डावपेच आखले जातील. केवळ एकनाथ खडसे हे आमचे टार्गेट नाही तर संपूर्ण महाविकास आघाडीला हरवणे हे आमचे ध्येय आहे, असे मत भाजपचे नेते तथा केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी गुरुवारी व्यक्त केले.
काही कामानिमित्त औरंगाबादच्या विभागीय आयुक्तालयात विधानसभेचे माजी अध्यक्ष आमदार हरीभाऊ बागडेंसमवेत आलेल्या दानवेंसाेबत पत्रकारांनी वार्तालाप केला. ‘एकनाथ खडसे यांना उमेदवारी दिली नाही तर आम्ही निवडणूक बिनविरोध करु असे भाजपचे धोरण होते का?’ या प्रश्नावर दानवे म्हणाले, ‘असे काहीही नाही. आमचा कोणाच्याही नावाला विरोध नाही. संपूर्ण आघाडीलाच हरवायचे आहे.’
गण-गटाच्या राजकारणात हस्तक्षेप करणार नाही
औरंगाबादच्या विभागीय आयुक्तालयात जिल्हा परिषद, पंचायत समिती गट- गणांवर गुरुवारी आक्षेप नोंदवून घेण्याची प्रक्रिया सुरु हाेती. यापैकी अनेक कार्यकर्त्यांनी राजकीय नेते, आमदार, मंत्र्यांनी साेयीनुसार गटरचना करुन घेतल्याचे आराेप केले. नेमके त्याच वेळी दानवे, बागडेंची आयुक्तालयात एन्ट्री झाल्याने राजकीय हस्तक्षेप हाेत असल्याची चर्चा सुरू झाली. याबाबत पत्रकारांनी विचारणा केली असता ‘मी सुनावणीत हस्तक्षेप करायला आलाे नाही. कार्यकर्ते त्यांचे काम करत आहेत. मी मतदार संघातील काही कामे हाेती, त्याबाबत आयुक्तांशी चर्चा करायला आलाे,’ असे उत्तर दानवेंनी दिले.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.