आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराजी-२० शिखर परिषद शहरात यशस्वीपणे पार पडल्यामुळे जगभरात शहराची प्रतिमा उंचावली आहे. आता नामांतरावरून शहराची शांतता भंग होऊ देऊ नका, सकारात्मक प्रसिध्दीला धक्का लागेल असे काहीच काही करू नका, असे आवाहन उद्योजक राम भोगले यांनी शनिवारी माध्यमांशी बोलताना केले. मराठवाडा एन्व्हायर्नमेंटल केअर क्लस्टरच्या माध्यमातून छत्रपती संभाजीनगरामध्ये शांतता-सलोखा अबाधित राखावा, अशी मागणी करणारे निवेदन देण्यात आले आहे.
राम भोगले म्हणाले की, कोविडनंतर शहराची अर्थव्यवस्था पूर्वपदावर येत असताना नामांतरामुळे शहराच्या प्रतिमेला धक्का लागेल असे काही घडू नये अशी आमची सर्वांची प्रामाणिक इच्छा आहे. शहराची प्रतिमा नकारात्मक झाल्यास गुंतवणूकदार शहरात यायचे की नाही, असा विचार गुंतवणूकदार करतात. शहर पुन्हा मागे जाते. या वेळी उद्योजक मानसिंग पवार, मुकुंद कुलकर्णी, आदेशपालसिंग छाबडा, शिवशंकर स्वामी, प्रसाद कोकीळ, प्रशांत देशपांडे, जसवंतसिंग उपस्थित होते.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.