आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराराज्यात गेल्या काही दिवसांपासून अनेक कर्मचारी संपावर जात आहेत. मात्र, त्यांना शासनाकडून फारसा प्रतिसाद मिळत नाही. राज्यातील महसूल कर्मचाऱ्यांचादेखील तीन दिवसापासून संप सुरू आहे. विशेष म्हणजे राज्यातील सर्व महसूल कर्मचारी संपावर गेले असतानादेखील महसूल कर्मचारी संघटनेला चर्चेसाठी अद्याप बोलावलेले नाही, अशी माहिती सूत्रांनी दिली. राज्यात एसटी कर्मचारी, वैद्यकीय शिक्षण विभागातील डॉक्टरांसह अनेक सरकारी कर्मचाऱ्यांनी अनेक दिवस आंदोलन केले. पण, त्यावर तोडगा काढला नव्हता. यात एसटी कर्मचारी तर अजूनही संपावर आहेत. आता महसूल कर्मचाऱ्यांच्या संपाकडे राज्य शासन दुर्लक्ष करत असल्याचे दिसून येत आहे.
मराठवाड्यात २८० महसूल सहायकांची पदे रिक्त
औरंगाबाद जिल्ह्यात महसूल सहायकची ६० पदे रिक्त आहेत. मराठवाड्यात महसूल सहायकांची २८० पदे रिक्त आहेत. याबाबत महसूल संघटनेचे मराठवाडा सरचिटणीस म्हणाले, २०१७ पासून महसूल सहायक पदाच्या जागा रिक्त असून त्या भरलेल्या नाहीत. या रिक्त पदांमुळे इतर लोकांवर कामाचा ताण वाढत आहे. त्यामुळे राज्यभर २१ मार्चपासून वेगवेगळ्या टप्प्यात आंदोलन केले जात आहे. यात सुरुवातीला काळ्या फिती लावून, त्यानंतर एक दिवस आंदोलन आणि आता बेमुदत संप सुरू आहे. आमच्याशी कोणीही संपर्क केलेला नाही. मात्र, आम्ही जोपर्यंत मागण्या मान्य होत नाहीत तोपर्यंत बेमुदत संप कायम ठेवणार असल्याचे त्यांनी सांगितले.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.