आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
राज्यात काेविडमध्ये उत्कृष्ठ काम करणाऱ्या वैद्यकिय अधिकारी, कर्मचारी या कोरोना योद्ध्यांचा मंगळवारी ता. १५ मुंबई येथे राजभवनात सायंकाळी पाच वाजता राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या हस्ते सत्कार केला जाणार आहे. यासाठी निवडल्या गेलेल्या अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या स्वॅब चाचणी करूनच उपस्थित राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
राज्यात कोविडमध्ये उत्कृष्ठ काम करणाऱ्या वैद्यकीय अधिकारी, कर्मचारी यांच्यासह इतर कामगारांचा कोरोना योद्धा म्हणून सत्कार केला जाणार आहे. त्यासाठी अधिकारी व कर्मचाऱ्यांची निवड करण्यात आली आहे. यामध्ये वैद्यकीय अधिकारी डॉ. रवीभुवन (अमरावती), डाॅ. अरुणा पोहरे (रायगड), डॉ. सर्वेश पाटील (जालना), डॉ. किरण खलाटे (पुणे), डॉ. एस. बी. गुंजाळ (घोडेगाव, ता. नेवासा), डॉ. उज्वल इंदूरकर (मुल, जि. चंद्रपूर) यांचा समावेश आहे. अधिपरिचारिकांमध्ये कविता बेरड (अमरावती), गीता भांगरे (ठाणे), जयश्री फत्तेपुरे (हिंगोली), प्रतिभा घोडके (धुळे), सरोज पिल्ले (पुणे), अधिपरिचारक रामेश्वर नागरे (मुल, जि. चंद्रपूर) यांचा समावेश आहे.
या सोबतच प्रयोगशाळा वैज्ञानिक अधिकाऱ्यांमध्ये शिरीष गुंजवटे (पुणे), सदानंद कांबळे (उल्हासनगर, ठाणे), जयचंद नेलवाडे (आष्टी, जि. बीड), तेजस्विनी किरणापुरे (गोंदिया), एस. बी. यळवंदे (घोडेगाव ता. नेवासा), केशव मुंडे (नेर, जि. यवतमाळ) यांचा समावेश आहे. आरोग्य सेविका सोनल पटले (गोंदिया), मुकुंद शेख (कंजवाहिरे, जि. पुणे), आशा स्वयंसेविका निर्मला काळे (माळसिरस, जि. पुणे), शोभा तोरकड (हिंगोली), रेणुका नाईक (पुणे), परिसेविका अलकनंदा भुरे (पनवेल, जि. रायगड), औषध निर्माण अधिकार कमलाकर वांगीकर (शहापुर जि. ठाणे), क्ष किरण अधिकारी नरेंद्र शिंदे (धुळे), बृहंन्मुंबई महापालिकेतील वैद्यकीय अधिकारी डॉ. प्रशांत काळे, अधिपरिचारिका विजया शिंदे, वॉर्डबॉय दामोदर काळेकर, प्रयोगशाळा वैज्ञानिक अधिकारी महेश सनगर, आरोग्य सेविका विद्या कांबळे, आशा कर्मचारी उषा बांबळे, भट्टी चालक दिलीप पवार यांचा समावेश आहे.
यांचाही होणार राज्यपालांच्या हस्ते गौरव
डॉ. वर्षा पोतदार, डॉ. प्रज्ञा यादव, डॉ. गजानन सपकाळ (एन. आय. व्ही. पुणे), डॉ. राकेश वाघमारे (पुणे), डॉ. कल्पिका पै (मुंबई), डॉ. सुनील भौसारे (मुंबई), अधिपरिचारक प्रेम गायकवाड (पुणे), कक्ष सेवक मोहन सोलार (औरंगाबाद), प्रयोगशाळा वैज्ञानिक अधिकारी नंदकुमार मेश्राम (नागपूर), कक्ष सेवक व सफाईकामगारांमध्ये संदीप मोरे (हिंगोली), जितेंद्र कणके (धुळे), नितेश वाघाडे (सालेकसा, जि. चंद्रपूर), पूनम कुडिया (उल्हासनगर ठाणे), मोहन वावळे (पंढरपूर), कैलास बेंडवाल (बुलडाणा) यांचा समावेश आहे.
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.