आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

वेगळी पायवाट:तरुण अभियंत्याने 17 मिनिटांच्या नि:शब्द लघुपटात साधला भय, रहस्याचा थरार

औरंगाबाद19 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक
लॉकडाऊनच्या काळात शासकीय नोकरी सांभाळत आठ दिवसांमध्ये पवन गंगावणे यांनी ‘द गेस्ट’चे चित्रीकरण केले. - Divya Marathi
लॉकडाऊनच्या काळात शासकीय नोकरी सांभाळत आठ दिवसांमध्ये पवन गंगावणे यांनी ‘द गेस्ट’चे चित्रीकरण केले.

छतावरचा पंखा बंद होतो. बाहेर बेधुंद कोसळणाऱ्या पावसाचा आवाज, निर्मनुष्य रस्ता मन चिंब करू लागतो. पिंपळाच्या पानांची सळसळ कान भरून टाकते. सिनेमातील पात्रांच्या दैनंदिन क्रिया पडद्यावर दिसू लागतात. आता कुणी तरी येईल, आता एखादा संवाद होईल, अशा प्रतीक्षेत असलेला प्रेक्षक. हॉरर चित्रपटाचा अत्यंत वेगळा असा हा आयाम दाखवणारा पवन गंगावणेचा ‘द गेस्ट’ लघुपट आहे, असे मत ज्येष्ठ समिक्षक डॉ. अजित दळवी यांनी व्यक्त केले.

आंतरराष्ट्रीय महोत्सवात गौरव

विविध आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात समीक्षकांचे लक्ष वेधलेला ‘द गेस्ट’ लघुपट चित्रपट चावडीमध्ये दाखवण्यात आला. या वेळी डॉ. दळवी बोलत होते. याप्रसंगी एमजीएम फिल्म इंस्टिट्यूटचे प्रमुख शिव कदम, वृत्तपत्र विद्या महाविद्यालयाच्या प्राचार्य डॉ. रेखा शेळके, शिक्षणाधिकारी पी. बी. चव्हाण आणि यंशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान विभागीय केंद्र औरंगाबादचे सचिव नीलेश राऊत उपस्थित होते.

समीक्षा ते निर्मिती

पवन गंगावणे यांनीही सिनेमांची आवड, समीक्षा ते निर्मिती असा प्रवास उलगडून सांगितला. रहस्यमयी वळणावर संपलेल्या सिनेमाचे विविध पैलू त्यांनी सांगितले. यावेळी ते म्हणाले, जगात नसलेल्या व्यक्ती जिवंत व्यक्तींशी संवाद साधत नाहीत पण, मृत व्यक्ती देखील एकमेकांशीही संवाद साधत नसतात, ही थेअरी लघुपटातून मांडण्याचा मी प्रयत्न केला आहे. लघुपट म्हटले की, काही ना काही सामाजिक संदेश देण्याचा प्रयत्न असतो. पण, मला कोणताही संदेश द्यायचा नव्हता, असे त्यांनी सांगितले.

सिनेमे बघत - बघत...

पंचायत समिती येथे सहाय्यक अभियंता पदावर कार्यरत असलेल्या पवनकुमार गंगावणे यांनी शासकीय कामांची दैनंदिन जबाबदारी सांभाळत, सिनेमाची निर्मिती केली. हा लघुपट कोरोना काळात लॉकडाऊनमध्ये चित्रित केला आहे. विशेष म्हणजे बाहेर जाण्यास निर्बंध लागलेले असल्याने पवनने स्वतःच्या घरातच चित्रीकरण केले. सात दिवसांत हे चित्रीकरण पूर्ण झाले. यानंतर पोस्ट प्राॅडक्शनसाठी ८ महिन्यांचा कालावधी गेला. पवनकुमार स्थापत्य अभियंता असून त्याने फिल्ममेकिंगचे कुठलेही शिक्षण घेतलेले नाही. परंतु लहानपणापासूनच सिनेमावर प्रेम असल्याने सिनेमे बघत बघतच फिल्ममेकिंगचे धडे आत्मसात केले, असे त्यांनी सांगितले.

लघुपट पाहण्यासाठी एमजीएममध्ये जमलेले प्रेक्षक.
लघुपट पाहण्यासाठी एमजीएममध्ये जमलेले प्रेक्षक.
बातम्या आणखी आहेत...