आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करायेथील मंगलमूर्ती कॉलनीत किरायाच्या खोलीत राहणाऱ्या टुनटुनकुमार रमाकांत ठाकूर (३४, रा. बागमारा, जि. भागलपूर, बिहार) कामगाराचा १२ मे रोजी अर्धनग्नावस्थेत मृतदेह आढळला. घटनेनंतर स्थानिक पोलिस, ठसेतज्ज्ञ व श्वानपथकाने घटनास्थळी पोहोचून कारवाई केली. मंगलमूर्ती कॉलनी, रांजणगाव येथे नाजीम रज्जाक सय्यद यांच्याकडे ठाकूर हा एकटाच किरायाने राहत होता.
दरम्यान, गुरुवारी दुपारी साडेबारा वाजेच्या सुमारास शेजारच्या खोलीत राहणारे दानिश शेख व अजहर बेग घरी आले असता त्यांना ठाकूरच्या घराचा दरवाजा उघडा दिसला. त्यांनी आत डोकावून बघितले असता, ठाकूरच्या तोंडातून फेस येत असल्याचे लक्षात आले. घटनेची माहिती पोलिसांना मिळताच त्यांनी बेशुद्धावस्थेतील ठाकूरला रुग्णवाहिकेतून घाटी रुग्णालयात हलविले. मात्र वैद्यकीय अधिकाऱ्यांनी मृत घोषित केले. संशयास्पद अवस्थेत आढळला मृतदेह : ठाकूर हा फक्त अंडरवियरवर पडलेला होता. त्याच्या डोक्याच्या पाठीमागे तसेच काखेतून रक्तस्राव झाल्याचे निदर्शनास आले.
ठाकूर बुधवारी सायंकाळी ४ वाजेच्या सुमारास कंपनीतून सुटी झाल्यानंतर घरी आला होता. त्यानंतर तो सांयकाळी ६ वाजेच्या सुमारास भाजीपाला खरेदी करून पुन्हा घरी आला, अशी माहिती घर मालकाने दिली. परिसरातील सीसीटीव्ही कॅमेरे तपासले असून शवविच्छेदनानंतर पुढील तपासाची दिशा स्पष्ट होणार असल्याची माहिती पोलिसांनी दिली.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.