आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

माणसं जोडण्याची कला:श्रद्धांजली सभेत दिलीप धारूरकर यांच्या आठवणींनी गहिवरले सभागृह

औरंगाबाद3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

महाराष्ट्र राज्याचे माजी माहिती आयुक्त, दै. तरुण भारतचे संपादक, उत्कृष्ट लेखक, प्रभावी वक्ते दिलीप धारूरकर यांना माणसं जोडण्याची कला अवगत होती. त्यांनी समविचारी लोकांप्रमाणेच अन्य विचारधारेच्या माणसांनाही आपले चांगले मित्र बनवले होते, असे प्रतिपादन सेवा भारतीचे राष्ट्रीय सहसंयोजक विजयराव पुराणिक यांनी केले. दिलीप धारूरकर यांचे १ ऑगस्ट रोजी निधन झाले. त्यानिमित्ताने १९ ऑगस्ट रोजी महसूल प्रबोधिनी येथे श्रद्धांजली सभा घेण्यात आली. या वेळी राजकीय क्षेत्रातील सहकारी, मित्रपरिवार, संघराष्ट्रीय परिवारातील सहकारी, शासकीय सेवेतील सहकारी तसेच अन्य आप्तेष्टांनी त्यांच्या आठवणींना उजाळा देऊन शब्दरूपाने श्रद्धांजली अर्पण करताना अनेकांना गहिवरून आले त्या वेळी ते बाेलत हाेते.

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, स्वयंसेवक संघाचे सहसरकार्यवाह डॉ. मनमोहन वैद्य आदींनी पत्राद्वारे शोक संदेश पाठवले. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी दिलीप धारूरकर यांची दुःखद वार्ता मनाला धक्का देणारी असल्याचे व्हिडिओच्या माध्यमातून शोकसभेत सांगितले. आमदार हरिभाऊ बागडे यांनी दिलीप यांचे कर्तृत्व बहुआयामी होते. राष्ट्रविरोधी विषयांचा ते आपल्या ‘प्रहार’ या सदरातून यथोचित समाचार घेत. त्यांचे अचानक निघून जाणे वेदनादायी असल्याचे बागडे म्हणाले. सुधाकर दानवे, अरुण समुद्रे, रत्नाकर कुलकर्णी, सुरेश केसापूरकर, दत्ता जोशी, हरिभाऊ बागडे, सुधाकर बारगजे, रमेश पांडव, राजारामभाऊ मुळे आदींनी त्यांना श्रद्धांजली अर्पण केली.

दिलीप हे धनासक्त नव्हते, ज्ञानासक्त होते : डॉ. गव्हाणे
यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ. सुधीर गव्हाणे यांनी दिलीप धारूरकर हे ज्ञानासक्त होते, ऊर्जादायी व्यक्तित्व होते. त्यांचे अचानक जाणे म्हणजे मोठं नुकसान आहे. बातमी कशी असावी, कशी शोधावी, कशी लिहावी, याविषयी मार्गदर्शन करणारा त्यांच्याइतका चांगला शिक्षक उपलब्ध होणं ही भाग्याची बाब होती.

बातम्या आणखी आहेत...