आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

काँग्रेसची पद यात्रा:हर घर तिरंगा या मोहिमेला भाजपने उत्सवी स्वरूप दिले; काँग्रेस प्रवक्ते सचिन सावंत यांची टीका

औरंगाबाद6 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

हर घर तिरंगा ही मोहीम राबवण्यात भाजपने आघाडी घेतल्या नंतर आता काँग्रेसच्या वतीने आजादी गौरव यात्रा सर्वत्र निघणार आहे .प्रत्येक जिल्ह्यात किमान 75 किलोमीटर ही पदयात्रा निघणार आहे. हर घर तिरंगा या मोहिमेला भाजपने उत्सवी स्वरूप दिले आहे अशी टीका काँग्रेस प्रवक्ते सचिन सावंत यांनी केली आहे ते रविवारी गांधी भवन मध्ये घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत बोलत होते.

यावेळी सावंत यांनी सांगितले की काँग्रेसला स्वातंत्र्य चळवळी संदर्भातला एक इतिहास आहे. देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यात काँग्रेसचे महत्त्वपूर्ण भूमिका होती. त्यामुळे या महोत्सवी वर्षात काँग्रेसच्या वतीने विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.

प्रत्येकाने एक तास द्यावा

यामध्ये सर्वत्र पदयात्रा चे आयोजन करण्यात आले आहे सावंत यांनी सांगितले की काँग्रेसची ही पदयात्रा राजकीय स्वरूपाची नसून यामध्ये प्रत्येक नागरिकांनी सहभाग घेतला पाहिजे.प्रत्येकाने किमान एक तास पदयात्रेत चालले पाहिजे. औरंगाबादच्या या पदयात्रेत काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले हे देखील सहभागी होणार आहेत 9 ऑगस्ट ते 15 ऑगस्ट दरम्यान काँग्रेसची ही आजादी गौरव यात्रा प्रत्येक जिल्ह्यात असणार आहे.

भाजपवर जोरदार टीका

सावंत म्हणाले की भाजप सध्या प्रत्येक गोष्टीचे राजकारण आणि इव्हेंट असे सोहळ्याचे स्वरूप देत आहे. देशात भाजपने अराजकता माजवली असून इडी तसेच इतर शासकीय संस्थांचा गैरवापर करण्यात येत आहे. संजय राऊत यांच्यावर करण्यात आलेली कारवाई ही याचाच भाग असल्याचे सावंत यांनी सांगितले.

संभाजी महाराजांबद्दल विरोध नाही

औरंगाबादच्या नामांतराच्या भूमिकेबद्दल बोलताना सावंत यांनी सांगितले की मंत्रिमंडळ बैठकीत संभाजीनगर नावाचा प्रस्ताव आला. मात्र काँग्रेसचा सर्व नामांतराला विरोध आहे संभाजी नगर चा नामकरणाचे वेळी संभाजी महाराज यांच्या नावाचा प्रस्ताव आल्यामुळे त्याला विरोध केला नाही भाजपला सत्तेपासून हटवणे हेच काँग्रेसचे ध्येय असून त्यासाठीच महाविकास आघाडी एकत्र आल्याचे त्यांनी सांगितले या पत्रकार परिषदेत शहराध्यक्ष युसुफ पटेल जितेंद्र देहाडे माजी शहराध्यक्ष सय्यद अक्रम अरुण शिरसाठ यांच्यासह विविध पदाधिकारी उपस्थित होते

बातम्या आणखी आहेत...