आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

2 दिवसांत कोरोनाचे 24 रुग्ण वाढले:आरोग्य विभागाने रुग्णांच्या संपर्कातील व्यक्तींची शोधमोहीम घेतली हाती

छत्रपती संभाजीनगर2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

गेल्या दोन दिवसांत शहरात २४ नवीन कोरोना रुग्णांची भर पडली आहे. त्यामुळे शहर व ग्रामीण भागात मिळून सध्या ५२ सक्रिय रुग्ण आहेत. यात दोनच रुग्ण ग्रामीण भागातील असून शहरातील ५० रुग्णांचा समावेश आहे. काही दिवसांपासून शहरात कोरोना रुग्णांची संख्या वाढू लागल्याने पालिकेच्या आरोग्य विभागाने नव्याने सापडणाऱ्या कोरोना रुग्णांच्या संपर्कातील व्यक्तींना ट्रेस करणे सुरू केले आहे. मात्र बहुतांश रुग्ण मोबाइल नंबर, घराचा पत्ता चुकीचा देत असल्याने रुग्णांच्या संपर्कातील व्यक्तींना शोधणे कठीण जात असल्याचे सूत्रांनी सांगितले. या पार्श्वभूमीवर मागील दोन दिवसांत शहरात २४ रुग्णांची भर पडली आहे. मंगळवारी (११ एप्रिल) १२ रुग्णांची नोंद झाली होती, तर बुधवारी आणखी १२ जणांचे अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आले.

पालिकेकडे प्राप्त अहवालानुसार, १ ते १२ एप्रिलदरम्यान शंभरपेक्षा अधिक रुग्णांचे अहवाल कोरोना पॉझिटिव्ह निघाले आहेत. दोन दिवसांपासून चाचण्यांचे प्रमाणही वाढवण्यात आले आहे. त्यामुळे पॉझिटिव्ह रुग्णांच्या संख्येत वाढ झाल्याचे दिसत आहे. सध्या सण-उत्सवाचे दिवस असल्याने पालिकेच्या आरोग्य विभागाने प्राथमिक उपाययोजनांसह काळजी घेण्याचे आवाहन नागरिकांना केले आहे.