आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ओबीसी आरक्षणाचा महत्त्वाचा मुद्दा:नगरपालिका निवडणुकीबाबत 10 एप्रिलला होणार सुनावणी

छत्रपती संभाजीनगर2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

राज्यातील ९२ नगरपालिकांमधील ओबीसी आरक्षण आणि महाराष्ट्रातील प्रलंबित असलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसंदर्भातील याचिका ॲड. देवदत्त पालोदकर यांनी सर न्यायाधीश डॉ. धनंजय चंद्रचूड यांच्या खंडपीठासमोर मेन्शन केल्या. यावर १० एप्रिल रोजी सुनावणी ठेवण्याचे निर्देश सर न्यायाधीशांच्या खंडपीठाने दिले आहेत.

ओबीसी आरक्षण तसेच महाराष्ट्रातील प्रलंबित असलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसंदर्भातील याचिकांवर सर न्यायाधीश डॉ. धनंजय चंद्रचूड व न्यायमूर्ती पी. एस. नरसिंहा यांच्या खंडपीठासमोर सुनावणी सुरू आहे. यापूर्वीच्या सुनावणीत याचिकाकर्त्यांच्या वतीने ॲड. देवदत्त पालोदकर यांनी सर्वोच्च न्यायालयात असे सांगितले होते की, ओबीसी आरक्षणाचा महत्त्वाचा मुद्दा निकाली निघालेला आहे. महाराष्ट्रात आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये ओबीसी आरक्षण दिले जात आहे. हा प्रश्न केवळ ९२ नगरपालिकांच्या निवडणुकांसंदर्भात प्रलंबित आहे.