आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

हिंगोली:राज्यात पोलिस अधिकारी कर्मचाऱ्यांचे मनोबल वाढवण्यासाठी गृहमंत्र्यांनी पाठवले व्हॉइस मेसेज

हिंगोली10 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

राज्यात करण्याच्या पार्श्वभूमीवर कोरोना योद्धा म्हणून पुढे आलेल्या राज्यातील पोलिस अधिकारी व कर्मचाऱ्यांचे मनोबल वाढवण्यासाठी राज्याचे  गृहमंत्री अनिल देशमुख यांनी पोलीस विभागातील अधिकारी कर्मचाऱ्यांना व्हॉइस मेसेज पाठवले आहे आहे . पोलीस विभागाकडून केल्या जाणाऱ्या कामाचे त्यांनी कौतुक केले असून थेट गृहमंत्र्यांच्या व्हॉइस मेसेज मुळे पोलीस विभागाला एक प्रकारे बळ मिळाल्याचे बोलले जात आहे.

राज्यात कोरोनाचा प्रभाव दिवसेंदिवस वाढू लागला आहे. विशेषतः मुंबई, पुणे या मोठ्या शहरांमधून कोरोनाच्या रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. मात्र या परिस्थितीतही जिल्हा प्रशासन व आरोग्य विभागात सोबतच पोलिस विभागाचे अधिकारी व कर्मचारी २४ तास कर्तव्यावर आहेत. संचारबंदीच्या काळात तसेच जनतेला आवश्यक मदतीच्या वेळी पोलीस दल पुढे येऊ लागले आहे. काही ठिकाणी तर पोलीस अधिकाऱ्यांनी चक्क गीते सादर करून नागरिकांमध्ये जनजागृती केली. तसेच त्यांना घरातच थांबण्याची आवाहन केले आहे.

दरम्यान आता राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी राज्यातील सर्व पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांना व्हाईस मेसेज पाठवले आहेत. यामध्ये  गृहमंत्री देशमुख यांनी आपण  गृहमंत्री म्हणून नव्हे तर एक  कुटुंबप्रमुख म्हणून बोलत असून मागील अडीच महिन्यांपासून पोलीस अधिकारी व कर्मचारी दिवस-रात्र एक करून काम करत आहेत.  या काळामध्ये अनेक जण कोरोना संक्रमित देखील झाले तर  काही जणांवर दुर्दैवी प्रकारही ओढवले आहेत. राज्य सरकार पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या पाठीशी आहेच सोबतच राज्यातील जनताही आपल्या पाठीशी आहे. पोलीस अधिकारी कर्मचाऱ्यांनी स्वतःची व कुटुंबाची काळजी घ्यावी असे आवाहनही त्यांनी केले आहे.

दरम्यान वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांसह जिल्हा पातळीवर व स्थानिक पातळीवरील पोलिस अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या भ्रमणध्वनीवर धडकणाऱ्या व्हॉइस मेसेज मुळे त्यांचे मनोबल ही वाढले असल्याचे बोलले जात आहे.

बातम्या आणखी आहेत...