आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

राज्य आंतरविद्यापीठ स्पर्धा:यजमान व्हॉलीबॉल संघ विजयी

औरंगाबाद2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

राज्य आंतरविद्यापीठ स्पर्धेत पहिल्या दिवशी यजमान डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या व्हॉलीबॉल पुरुष संघाने बीएसके दापोली संघावर २५-१४, २५-१४ सेटने मात करत विजयी सुरुवात केली. यात पवन पवार, शोएब शेख, प्रल्हाद सोमवंशी, मारुती हसुरे, मो. अन्सार यांनी उत्कृष्ट कामगिरी केली. आज स्पर्धेतील सर्व क्रीडा प्रकाराला सकाळी ७ वाजेपासून सुरुवात होईल. बास्केटबॉल पुरुष स्पर्धेत एनएमयू जळगाव, कोल्हापूरचे शिवाजी विद्यापीठ, एसजेएयू अमरावती संघाने विजय सलामी दिली. पहिल्या दिवशी मोजके सामने घेण्यात आले.

निकाल पुढीलप्रमाणे : एनएमयू जळगाव वि.वि. एसआरटीएम नांदेड (३७-५१), गोंडवाना विद्यापीठ वि.वि. राहुरी कृषी विद्यापीठ (४०-१०), लोणार कृषी विद्यापीठ वि.वि. अकोला विद्यापीठ (२३-११), शिवाजी विद्यापीठ वि. वि. कृषी विद्यापीठ परभणी (४७-०२), विज्ञान विद्यापीठ नाशिक वि.वि. रामटेक विद्यापीठ (२०-० बाय), एसजीएयू अमरावती वि.वि. एसएनडीटी विद्यापीठ मुंबई (३६-२०).

बातम्या आणखी आहेत...