आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराजटवाडा परिसरातील एका चहाच्या हॉटेलवर काम करणाऱ्या महिलेला हॉटेल मालकाने चटका दिला. त्या महिलेच्या दोन्ही मुलांनी आईला चटका का दिला, याचा जाब विचारताच हॉटेल व्यावसायिकाने दोघा भावांवर धारदार चाकूने हल्ला केला. या हल्ल्यात मुर्तुजा अली युसूफ अली (३०, रा. सईदा कॉलनी) आणि शहजाद अली सय्यद युसूफ अली हे दोघे गंभीर जखमी झाले आहेत. ही घटना ९ मे रोजी घडली असून जखमींवर घाटीत उपचार सुरू आहेत.
सईदा कॉलनीतील मुर्तुजा अली युसूफ अली यांची आई आजारी असते. मात्र, ती छोटे-मोठे काम करते. जटवाडा येथील एका चहाच्या हॉटेलवर काम करत असताना हॉटेल मालक वसीम बरकत याने त्यांच्या हाताला चटका दिला. ही घटना शहजाद अली याला कळताच त्याने मोबाइलमध्ये फोटो काढून मुर्तुजाला दाखवले. आईला घेऊन थेट जाब विचारण्यासाठी जटवाडा परिसरातील हॉटेलवर गेला. त्या ठिकाणी वसीम हॉटेलवर बसलेला होता. मुर्तुजापाठोपाठ शहजाद अलीदेखील हॉटेलवर आला. दोघे भाऊ चटका का दिला म्हणून विचारणा करत असताना त्या ठिकाणी वसीमचा भाऊ शाहरुख आला. त्या दोघांनी मिळून मुर्तुजा आणि शहजाद यांना मारहाण केली.
त्यानंतर चाकूने शहजादच्या पायावर वार केले. यात १४ टाके पडले आहेत. तर मुर्तुजाच्या बरगडी, किडनीत चाकूचे वार केले. यात तो गंभीर जखमी झाला आहे. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घाटीत जखमींचा जबाब घेऊन बेगमपुरा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.