आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बैठक:घाटीतील 354 चतुर्थश्रेणी कर्मचाऱ्यांची घरे पाडणार ; पाडलेल्या जागेचा निर्णय झाला नाही

औरंगाबाद5 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

घाटी रुग्णालयातील चतुर्थश्रेणी कर्मचाऱ्यांची ३५४ घरे पाडण्याचा ठराव सोमवारी (७ नोव्हेंबर) अभ्यागत समितीच्या बैठकीत मंजूर झाला. पोलिस बंदोबस्त मिळताच ही कारवाई होणार असल्याचे सांगण्यात आले. विशेष म्हणजे समितीच्या बैठकीतूनच पोलिस आयुक्त डॉ. निखिल गुप्ता यांना सुरक्षेसाठी पोलिस बंदोबस्त पुरवावा, अशी मागणी करण्यात आली. ती त्यांनी तत्काळ मान्य केली. त्यामुळे ५० वर्षांपूर्वी बांधलेल्या इमारती पडू शकतील, अशी चिन्हे आहेत. समितीमध्ये भाजपच्या एकाही कार्यकर्त्याला स्थान नसल्याने ३ नोव्हेंबरची बैठक जैस्वाल यांच्या मुंबई दौऱ्याचे कारण पुढे करून रद्द करण्यात आली होती. ७ नोव्हेंबरच्या बैठकीपूर्वी समितीतून मविआ समर्थक सदस्यांची पाठवणी करून भाजप समर्थकांची नेमणूक होईल, अशी चिन्हे होती. सहकारमंत्री अतुल सावे, भाजपचे प्रदेश सरचिटणीस संजय केणेकर यांनी तसे संकेतही दिले होते. प्रत्यक्षात तसे काहीही घडले नाही.

बातम्या आणखी आहेत...