आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अ‍ॅडव्हांटेज महाराष्ट्र एक्स्पोचे उद्घाटन अखेर ऑनलाइनच:सहामाही परीक्षेत आम्ही मेरिटमध्ये आलो : शिंदे

औरंगाबादएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

मराठवाडा असोसिएशन ऑफ स्मॉल स्केल इंडस्ट्रीज अँड अॅग्रिकल्चर (मसिआ) आयोजित अॅडव्हांटेज महाराष्ट्र एक्स्पो २०२३ च्या उद्घाटन अखेर ऑनलाइन झाले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा औरंगाबाद दौरा गुरुवारी सकाळी अचानक रद्द झाला. केंद्रीय वित्त राज्य मंत्री डॉ. भागवत कराड आणि उद्योग मंत्री उदय सामंत यांच्या हस्ते या प्रदर्शनाचे उद्घाटन करण्यात आले.

ऑनलाइन संबोधनात मुख्यमंत्री शिंदे म्हणाले, ६ महिने पूर्ण करणारे आपले सरकार सहामाही परीक्षेत मेरीटमध्ये आले. आता वार्षिक परीक्षेत देशात पहिल्या क्रमांकावर येणार आहे. आम्ही उद्योजकांना भेटतो, घरात बसून बाहेरच्या समस्या कशा समजतील? असा टोला मुख्यमंत्री शिंदे यांनी नाव न घेता माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना लगावला.

योगींची भेट मराठवाड्यातील उद्योगांपेक्षा महत्त्वाची : दानवे योगींसोबतच्या बैठकीमुळे शिंदेंचा औरंगाबाद दौरा रद्द झाल्याचे बोलले जाते. या पार्श्वभूमीवर विरोधीपक्ष नेते अंबादास दानवे म्हणाले की, मुख्यमंत्र्यांना मराठवाड्यातील उद्योगांपेक्षा उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री आदित्यनाथ योगी महत्त्वाचे आहेत.

बातम्या आणखी आहेत...