आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ट्रॅक्टरच्या चाकाखाली चिरडून सातवीची विद्यार्थीनी ठार:शाळेतून सायकल वरून घरी जाताना बहिरगाव-डोणगाव रोडवर​ घडली घटना

कन्नड8 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

शाळेतून सायकल वरून घरी जाताना अचानक ट्रॅक्टरच्या चाकाखाली आल्याने सातवी वर्गातील श्रद्धा सोमिनाथ पिंपळे (13, रा. डोणगाव वस्ती, ता. कन्नड) हि मुलगी ठार झाली. हा अपघात पाणपोई फाटा, राष्ट्रीय महामार्ग लगत बहिरगाव-डोणगाव रोडवर​ शुक्रवारी साडे चारच्या सुमारास घडली.

उपचारासाठी नेताना वाटेतच मृत्यू

गंभीर जखमी झाली तीला उचपार दरम्यान रुग्णालयात नेत आसताना तीचा मृत्यू झाला आहे. याबाबत अधिक माहिती अशी कि, श्रद्धा पिंपळे ही डोणगाव वस्ती येथे राहत होती. बनशेद्रा येथील शाळेत दररोज सायकलवर जाऊन शिक्षण घेत होती. चार वाजता शाळा सुटल्याने ती घरी सायकल वर जात होती.

ट्रकच्या चाकाखाली आली

राष्ट्रीय महामार्ग लगत बहिरगाव-डोणगाव रोडवर दोन्ही बाजूला एका व्यावसायिकाची जमीन असून एका बाजूने मुरूम दगडाची टेकडी असून तीन जेसीबी व बारा ते पंधरा ट्रॅक्टरद्वारे तिथे उत्खनन करून रोडच्या दुसऱ्या बाजूला भराव करण्याचे काम गेल्या तीन ते चार दिवसापासून सुरू आहे. तेथेच भराव टाकणा-या टँक्टरच्या चाकाखाली ती आल्याने ती गंभीररित्या जखमी झाली होती. उपचारासाठी नेत असतानाच तिचा मृत्यू झाला.

4 दिवसांपासून टँक्टरचा धुडगूस

पाणपोई फाटा जवळच असलेल्या बहिरगाव -डोणगाव रोडवर एका मोठ्या टेकडीचे तीन चार जेसीबीच्या साहाय्याने उत्खनन चालु आहे. त्यामुळे त्या ठिकाणी ट्रॅक्टरच्या वाहनांचा अक्षरशः धुडगूस सुरू आहे. यंत्राने उत्खनन करण्याची परवानगी आहे का? असल्यास किती? आदी प्रश्न आता उपस्थित होत असून याकडे तहसील प्रशासन, महामार्ग पोलिस व आदी संबधित विभागाने गांभीर्याने लक्ष दिले नाही असा स्थानिकांचा आरोप आहे.

जीव मुठीत धरण्याची वेळ

या रोडवर बहिरगाव डोणगाव या गावाकडे जाणाऱ्या लोकांचे वर्दळ असते मात्र या ठिकाणी दिवसा मोठ्या प्रमाणात वाहनांचा धुमाकूळ सुरू आसल्याने जीव मुठीत घेऊन लोकांचा प्रवास सुरु आहे.

मुरुम वाहतुकीचा धुडगुस जीवावर

मुरुम वाहतूक करणाऱ्या टँक्टरच्या धुडगुस अखेर एका शाळकरी मुलीला आपला जीव बेतल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे. हे काम रात्री का करण्यात आले असते. असा प्रश्न सामाजिक कार्यकर्त्यांनी उपस्थितीत केला आहे. घटनेची माहिती मिळताच शहर पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक दिनेश जाधव यांनी घटनास्थळी येऊन ट्रॅक्टर चालक कार्तिक दिलीप रावते (रा. माटेगाव) यास अटक करून ट्रॅक्टर ताब्यात घेऊन गुन्हा नोंद करण्याची प्रक्रिया रात्री उशिरा पर्यंत सुरू होती.

मृतदेह ताब्यात घेण्यास नकार

शवविच्छेदन करण्यासाठी मुलीचा मृतदेह ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आला. या ठिकाणी संतप्त नातेवाईक यांनी मृतदेह ताब्यात घेणार नाही असा पवित्रा घेतल्याने रात्री उशिरा पर्यंत तणावाचे वातावरण होते.

बातम्या आणखी आहेत...