आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

औरंगाबाद जिल्हा परिषदेचा उपक्रम:आर्थिक उत्पन्नासाठी पे अ‍ॅन्ड पार्क सुरू करणार; जाहिरातीच्या होर्डिंगसाठीही देणार जागा

औरंगाबाद3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबादचे मिनी मंत्रालय असलेल्या जिल्हा परिषदेने आता स्वत:चे आर्थिक उत्पन्न वाढविण्यासाठी पे अ‍ॅण्ड पार्क आणि जाहिरातींचे होर्डिंग लावण्यासाठी जागा भाड्याने देण्याचा निर्णय घेतला आहे.अशी माहिती मुख्यकार्यकारी अधिकारी नीलेश गटणे यांनी दिली.

गटणे यांनी सांगितले की, जिल्हा परिषदेची जुनी 9 वाहने विकण्यात आली आहेत. यातून जिल्हा परिषदेला दोन लाखांचा फायदा झाला आहे. जि.प.च्या विविध योजनांसाठी शासनाकडून निधी देण्यात येत असतो. परंतु, कामे करण्यासाठी जे उत्पन्न आहे, ते तुटपुंजे आहे.

त्यामुळे कायम अडचणी येतात. जिल्हा परिषदेचे उत्पन्न वाढावे, यासाठी प्रयत्न करत असल्याचे गटणे यांनी सांगितले. त्याचाच एक भाग म्हणून जिल्हा परिषदेच्या मुख्यालयात पे अ‍ॅण्ड पार्क सुरू करण्याचा तसेच जि.प. च्या मोक्याच्या जागांचा जाहिरात होर्डिंगसाठी उपयोग करून घेण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. जि.प.च्या मुख्यालयामध्ये फुकटात वाहने लावून शहरात फेâरफटका मारणारे आणि चित्रपट पाहण्यासाठी जाणाऱ्यांची संख्या अधिक आहे. अशा व्यक्तींना आवर घालता यावा. यासाठी त्यांच्याकडून पैसे वसूल करता यावेत, यासाठी ‘पे अ‍ॅण्ड पार्कâ’चा निर्णय घेण्यात आला आहे. पे अ‍ॅण्ड पार्कâ आणि जाहिरतींसाठी एजन्सी नेमण्यात येणार असून, यासाठी लवकरच निविदा काढण्यात येणार असल्याचे गटणे यांनी माध्यमांशी बोलतांना सांगितले.दरम्यान जि.प.च्या ज्या जागांवर अतिक्रमण झाले आहे.त्या देखील रिकाम्या करून जि प च्या उपयोगात आणण्यासाठी प्रयत्न सुरू असल्याचे गटणे यांनी सांगितले. तसेच शाळांच्या वीजबिला संदर्भात माहिती घेत असल्याचे ते म्हणाले.

जि.प.च्या 9 वाहनांचा लिलाव -

जिल्हा परिषदेच्या 12 ते 15 वर्षे जुन्या असलेल्या 9 वाहनांचा नुकताच लिलाव करण्यात आला. या लिलावामधून 3 लाख 68 हजार 100 रुपये मिळणे अपेक्षित असताना 5 लाख 77 हजार 276 रुपये मिळाले आहेत. यामुळे जिल्हा परिषदेला 2 लाखांचा फायदा झाला आहे. दरम्यान नवीन 4 गाड्या खरेदी करण्यासाठीचा प्रस्ताव विभागीय आयुक्त कार्यालयात पाठविण्यात आल्याचेही त्यांनी सांगितले.

बातम्या आणखी आहेत...