आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जागोजागी साचली डबकी:शाकुंतलनगरात अंतर्गत रस्त्याचे गेल्या 20 वर्षांपासून कामच नाही

औरंगाबाद3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

गादिया विहार भागातील शाकुंतलनगरात गेल्या २० वर्षांपासून अंतर्गत रस्त्याची कामे झालेली नाहीत. यासोबतच खुल्या जागेला संरक्षण भिंत बांधण्यासाठीचा प्रस्ताव तीन वर्षांपासून रखडल्याचे नागरिकांनी सांगितले.शाकुंतलनगर येथे १९७० साली वसाहत होण्यास सुरुवात झाली. १९९५ साली काही घरे बांधण्यात आली. २००५ पासून या ठिकाणी ३० ते ३५ रहिवासी राहत आहेत. जागोजागी पाण्याची डबकी साचल्याने डास वाढले आहेत. त्यासोबतच पाच ते सहा घरे शेवटच्या लाइनमध्ये असल्याने त्यांना नळाचे पाणी येत नाही. अनेकांना कमी दाबाने पाणीपुरवठा हाेताे. येथील मनपाच्या खुल्या जागेला सरंक्षण भिंत नाही. पाण्याचे टँकर गेल्याने रस्त्याची दुरवस्था झालेली आहे. संरक्षण भिंत बांधण्यात यावी यासाठी रहिवाशांनी मनपा, आमदार, खासदारांना पत्र दिले. मात्र, हा प्रश्न सुटला नाही. आता मनपा प्रशासनाने ही समस्या सोडवावी, अशी मागणी होत आहे.

अंतर्गत रस्ते चिखलमय
अंतर्गत रस्त्यांची कामे २० वर्षांपासून झालेली नाहीत. त्यामुळे वारंवार चिखल हाेताे. यावर गाड्या स्लिप होत आहेत. मनपा प्रशासनाने रस्त्यांची डागडुजी करावी. - मकरंद कुलकर्णी

कमी दाबाने पाणीपुरवठा
अनेक घरे शेवटच्या लाइनमध्ये असल्याने त्यांना पिण्याचे पाणीच येत नाही. तसेच या भागात कमी दाबाने पाणीपुरवठा होताे. -अंजली कुलकर्णी

डुकरांचा सुळसुळाट
खुल्या जागेला संरक्षण भिंत नसल्याने या ठिकाणी डुकरांचा सुळसुळाट वाढला. तसेच, लहान मुलांना खेळण्यासाठी जागाच शिल्लक नाही.-अविनाश शहाडे

चिखल तुडवत जावे लागते
गल्ल्यांमधील रस्ते झालेले नाहीत. त्यामुळे पावसाळ्यात चिखल तुडवत जावे लागते. पाणी तुंबल्याने आरोग्याचा प्रश्न निर्माण झालेला आहे. - रेणुका सुताणे

बातम्या आणखी आहेत...