आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

विद्युतीकरणाचे खांब रोवले:नववर्षात जालना-मुंबई रेल्वेगाडी विजेवर धावणार, तारांचे काम सुरू

औरंगाबाद2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

मनमाड ते जालनादरम्यानच्या रेल्वे विद्युतीकरणाची गती चांगलीच वाढली आहे. डिझेल इंजिन फेल होण्याच्या घटनांमुळे नांदेड-मनमाडदरम्यान धावणाऱ्या अनेक रेल्वेगाड्यांना मोठी झळ सोसावी लागत होती. मनमाड ते रोटेगाव विद्युतीकरणानंतर रेल्वे इंजिनची यशस्वी चाचणी घेण्यात आली आहे. औरंगाबाद आणि जालन्याकडे विजेचे खांब रोवण्याचे काम पूर्ण झाले असून तारा ओढण्यात येत आहेत. डिसेंबरअखेरपर्यंत जालना स्थानकापर्यंतचे विद्युतीकरणाचे काम पूर्ण करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. नवीन वर्षात जालना ते मुंबई पहिली रेल्वे विजेच्या इंजिनावर चालवण्याचा रेल्वे प्रशासनाचा प्रयत्न आहे. देशात २०२३ पर्यंत सर्व मार्गांचे विद्युतीकरण करण्याचा निर्णय केंद्र सरकार आणि रेल्वे मंत्रालयाने घेतलेला आहे. त्या दृष्टीने मराठवाड्यासह अनेक मार्गांच्या विद्युतीकरणाचे काम वेगाने सुरू आहे.

बातम्या आणखी आहेत...