आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

औरंगाबादेत हत्यासत्र थांबेना:दलालवाडीत तरुणाचा चाकूने भोसकून खून; भांडण झाल्याने टोकाचे कृत्य

औरंगाबाद11 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

मे महिन्यापासून शहरात सुरू झालेली खुनांची मालिका अद्याप थांबायला तयार नाही. सोमवारी रात्री साडेनऊच्या सुमारास दलालवाडी परिसरात चाकूने भोसकून एका तरुणाची हत्या करण्यातआल्याची धक्कादायक घटना घडली आहे. शेख रिझवान (३२, रा. सिल्लेखाना) असे मृताचे नाव आहे. वसीम ऊर्फ हमजा कुरेशी (रा. दलालवाडी) याने हा खून केल्याची प्राथमिक माहिती असून हा संशयित फरार झालाआहे.

पोलिसांकडील माहितीनुसार, मृत शेख रिझवान आणि फरार संशयित कुरेशी हे एकमेकांच्या ओळखीचे आहेत. दलालवाडी परिसरात एका अर्धवट बांधलेल्या घरात ते सोमवारी सायंकाळी मद्यपान करीत होते. त्याच वेळी या दाेघांमध्ये वाद झाले. त्यामुळे चिडलेल्या कुरेशी याने शेख रिझवानला चाकूने भोसकले. यात तो गंभीर जखमी झाला. त्याला तत्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी धाव घेतली. या घटनेची क्रांती चौक पोलिस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे.

संशयित, मृतावर आधीही गुन्हे दाखल असल्याचा अंदाज

मृत रिझवान हा टपरी चालक होता, त्याच्या वडिलांचे एक छोटेसे हॉटेल आहे. मारेकरी कुरेशी आणि मृत रिझवान या दोघांवरही यापूर्वी गुन्ह्यांची नोंद असल्याचा अंदाज पोलिसांनी वर्तवला आहे. घटनास्थळाचा पंचनामा केला असता पोलिसांना खून झालेल्या जागेवर दारूचा भरलेला ग्लास व बाटली मिळाली.

बातम्या आणखी आहेत...