आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

धान्याचा अहवाल गुलदस्त्यात:क्वॉरंटाइन सेंटरमधील भोजनातील अळ्यांची वळवळ प्रयाेगशाळेपर्यंतच; अन्न व औषध प्रशासनानेही केले हात वर

हिंगोली2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
हिंगोली शहरातील अंधारवाडी क्वाॅरंटाइन सेंटरमध्ये महिनाभरापूर्वी भोजनात अळ्या निघाल्या होत्या तेव्हाचे छायाचित्र. - Divya Marathi
हिंगोली शहरातील अंधारवाडी क्वाॅरंटाइन सेंटरमध्ये महिनाभरापूर्वी भोजनात अळ्या निघाल्या होत्या तेव्हाचे छायाचित्र.

येथील अंधारवाडी क्वाॅरंटाइन सेंटरमध्ये भोजनात अळ्या निघाल्या प्रकरणात अन्न व औषध प्रशासनाने धान्याचे नमुने तपासणीसाठी औरंगाबाद येथील प्रयोगशाळेत पाठवले. मात्र एक महिना उलटूनही धान्याच्या तपासणीचा अहवालच प्राप्त झाला नाही. त्यामुळे नेमका अहवालासाठी लागणारा उशीर संशोधनाचा विषय बनला आहे. तर दुसरीकडे अहवाल प्राप्त झाल्याशिवाय पुढील कारवाई होणार नाही, असे सांगत अन्न व औषध प्रशासनाच्या अधिकाऱ्यांनी हात वर केले आहेत.

हिंगोली शहरालगत अंधारवाडी येथील मागासवर्गीय मुलांच्या वसतिगृहात विलगीकरण कक्ष करण्यात आले आहे. काेविड रुग्णांच्या संपर्कातील व्यक्तींना या विलगीकरण कक्षात ठेवले जात आहे. या ठिकाणी दाखल करण्यात आलेल्या संशयित रुग्णांसाठी भोजनाची व्यवस्था प्रशासनाकडून केली जात आहे. त्याचे कंत्राटही देण्यात आले आहे. मात्र या ठिकाणी ६ सप्टेंबर रोजी भोजनामध्ये अळ्या निघाल्याचा प्रकार घडला. त्यानंतर मोठी खळबळ उडाली होती. या प्रकरणानंतर परभणीच्या अन्न व औषध प्रशासनाच्या अधिकाऱ्यांनी ९ सप्टेंबर रोजी हिंगोली येथे आल्यानंतर संबंधित कंत्राटदारांच्या गोदामावर जाऊन धान्याचे नमुने तपासणीला घेतले. यामध्ये तांदूळ, डाळ, पीठ व तेलाचा समावेश आहे. हे नमुने तपासणीसाठी औरंगाबादच्या प्रयोगशाळेत पाठवले आहेत. मात्र अद्यापही या नमुन्याचा अहवाल प्राप्त झाला नाही. धान्य नमुने तपासणीला पाठवून महिना उलटूनही अद्याप अहवाल का प्राप्त झाला नाही, हा चर्चेचा विषय बनला आहे.

अहवाल प्राप्त झाल्यानंतरच निर्णय

हिंगोली जिल्ह्यातील काेविड सेंटरमधील भोजनात अळ्या निघाल्या प्रकरणात कंत्राटदाराच्या गोदामावर जाऊन धान्य नमुने घेतले आहेत. हे नमुने तपासणीसाठी औरंगाबाद येथे पाठवण्यात आले आहेत. आम्ही केवळ नमुने पाठवतो, अहवाल पाठवण्याचे काम प्रयोगशाळेचे आहे. त्या ठिकाणावरून अहवाल आल्यानंतरच पुढील कारवाईचा निर्णय घेतला जाणार आहे. नारायण सरकटे, सहायक आयुक्त अन्न व औषध प्रशासन विभाग, परभणी.

जेवणात अळ्या निघाल्यानंतर प्रशासनाने त्या ठेकेदाराकडील भोजन पुरवठ्याचे कंत्राट काढून घेतले. मात्र त्यानंतर कोणतीही कारवाई न झााल्याने हे प्रकरण मॅनेज झाल्याची चर्चा जोर धरू लागली आहे.

धान्य तपासणी अहवाल रखडल्याने उलटसुलट चर्चा सुरू

भोजनामध्ये अळ्या निघाल्याचा प्रकार घडला. त्यानंतर मोठी खळबळ उडाली होती. या प्रकरणानंतर परभणीच्या अन्न व औषध प्रशासनाच्या अधिकाऱ्यांनी ९ सप्टेंबर रोजी हिंगोली येथे आल्यानंतर संबंधित कंत्राटदारांच्या गोदामावर जाऊन धान्याचे नमुने तपासणीला घेतले. यामध्ये तांदूळ, डाळ, पीठ व तेलाचा समावेश आहे. हे नमुने तपासणीसाठी औरंगाबादच्या प्रयोगशाळेत पाठवले आहेत. मात्र अद्यापही या नमुन्याचा अहवाल प्राप्त झाला नाही. धान्य नमुने तपासणीला पाठवून महिना उलटूनही अद्याप अहवाल का प्राप्त झाला नाही, हा चर्चेचा विषय बनला आहे.

बातम्या आणखी आहेत...