आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

मराठा मोर्चा:जे नेते मूकमोर्चात सहभागी ते आता घरात लपून बसले; नरेंद्र पाटलांची आघाडी सरकारच्या मंत्र्यांवर टीका

नांदेड20 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक
मेळाव्यात द्वीपप्रज्वलन करताना संभाजीराजे छत्रपती व आदी.
  • काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस कधीही मराठा समाजाला आरक्षण देण्याच्या बाजूची नव्हती, पण फडणवीसांनी दिले

सकल मराठा समाजाच्या वतीने रविवारी नांदेड येथील मराठा एल्गार मेळाव्यात महाविकास आघाडी सरकारवर तोफ डागण्यात आली. संभाजीराजे छत्रपती यांनी अशोक चव्हाणांना आव्हान देत बुद्धिजीवी लोकांची समिती स्थापन करण्याचे आवाहन केले, तर अण्णासाहेब आर्थिक विकास महामंडळाचे अध्यक्ष अण्णासाहेब पाटील यांनी जे नेते मूकमोर्चात सहभागी ते आता घरात लपून बसल्याची टीका केली.

सकल मराठा समाज व स्वाभिमानी संभाजी ब्रिगेडच्या वतीने मराठा आरक्षण एल्गार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले. मेळाव्याच्या अध्यक्षस्थानी नरेंद्र पाटील होते. या वेळी बोलताना संभाजीराजे म्हणाले, सर्वोच्च न्यायालयात मराठा आरक्षणाची बाजू मांडताना नेमके काय झाले माहिती नाही. त्यामुळे आरक्षणाला स्थगिती मिळाली. मंत्रिमंडळ समितीचे अध्यक्ष अशोक चव्हाण यांना खरोखरच समाजासाठी काही करायचे असेल तर त्यांनी मराठासमाजातील बुद्धिजीवी लोकांची एक समिती स्थापन करावी.

फडणवीसांनी मराठा समजाला आरक्षण दिले

नरेंद्र पाटील यांनी महाविकास आघाडीवर टीकास्त्र सोडले. देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाले तेव्हा या माणसाला कशाला मुख्यमंत्री केले, अशी टीका झाली. परंतु त्यांनीच मराठा समाजाला आरक्षण दिले. मागासवर्गीय आयोगाचा मराठा समाजाला अनुकूल असा अहवालही त्यांनीच दिला. काँग्रेसच्या राजवटीत वर्ष १९८० पासून कधीही मराठा समाजाला आरक्षण मिळाले नाही. काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस कधीही मराठा समाजाला आरक्षण देण्याच्या बाजूची नव्हती. युती सरकारच्या काळात राज्यात ५२ मूकमोर्चे निघाले. कोणीही अडवणूक केली नसल्याचे सांगितले.