आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मागणी:विवाहितेवर सामूहिक अत्याचार, हत्येच्या घटनेविरोधात चर्मकार समाज एकवटला; क्रांती चौकात श्रद्धांजली सभा

छत्रपती संभाजीनगर2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

चिकलठाणा परिसरात ३२ वर्षीय विवाहितेवर कुख्यात गुन्हेगारांनी पाशवी अत्याचार करून हत्या केली. या घटनेविरोधात आता चर्मकार समाज एकवटला असून शुक्रवारी क्रांती चौकात पीडितेला श्रद्धांजली वाहण्याच्या अनुषंगाने एकत्र आला होता. या वेळी महिलांनी त्यांच्या संतापाला वाट करून देत खटला फास्ट ट्रॅक कोर्टात चालवावा, आरोपींना फाशीची शिक्षा व्हावी, असा तपास व्हावा, अशी मागणी करत न्याय मिळेपर्यंत लढा देण्याचा निर्धार केला.

२ एप्रिल रोजी प्रार्थनास्थळामध्ये गेलेली ३२ वर्षीय विवाहित एकटी घरी परतत होती. निर्मनुष्य परिसरात राहुल संजय जाधव (१९), प्रीतम ऊर्फ सोनू महेंद्र नरवडे (२४) आणि रवी रमेश गायकवाड (३४, सर्व रा. बकाल वस्ती, चिकलठाणा) या नराधमांनी झाडाला बांधून अत्याचार करत दगडाने ठेचून हत्या केली. कुटुंबाला आर्थिक हातभार म्हणून मदत गरजेची असून प्रत्येकाने मदतीसाठी पुढे येण्याचे आवाहन माजी नगरसेवक मनोज गांगवे यांनी केले.

गृहमंत्र्यांपर्यंत प्रकरण नेणार : दानवे विराेधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी शुक्रवारी सकाळी पीडितेच्या कुटुंबाच्या घरी जात भेट घेत त्यांचे सांत्वन केले. याप्रकरणी गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे आरोपींना कठोर शिक्षेसाठी फास्ट ट्रॅक कोर्टात प्रकरण चालवण्याची मागणी करणार सांगितले.