आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

हिंगोली:बिबट्याचा कुत्र्यावर हल्ला, शेतकऱ्याने आरडाओरड केल्याने बिबट्याने ठोकली धुम

हिंगोली3 महिन्यांपूर्वीलेखक: मंगेश शेवाळकर
  • कॉपी लिंक
  • ट्रॅप कॅमेरे बसविण्याची शेतकऱ्याची मागणी

कळमनुरी तालुक्यातील कांडली शिवारात गुरुवारी (ता. ७) सकाळी पुन्हा एकदा बिबट्याचे दर्शन झाले. यावेळी बिबट्याने एका शेतातील आखाड्यावर असलेल्या कुत्र्यावर हल्ला चढविला. मात्र शेतकऱ्याने आरडाओरड केल्यामुळे बिबट्याने धुम ठोकली. या भागात आता वन विभागाने ट्रॅप कॅमेरे बसविण्याची मागणी शेतकऱ्यातून केली जात आहे.

कांडली शिवारात मागील पंधरवाड्यात बिबट्याचे दर्शन झाले होते. मात्र पायाच्या ठशावरून तो बिबट्याच आहे किंवा नाही याबाबत वनविभाग देखील संभ्रमात होता. मात्र त्यानंतरही शेतकऱ्यांनी एकट्याने शेतात जाऊ नये असे आवाहन करण्यात आले आहे.

दरम्यान, आज सकाळी कांडली येथील शेतकरी संजय पानपट्टे हे शेतातील आखाड्यावर गेले होते. त्या ठिकाणी असलेली गाय व वासरू बाहेर सोडून ते काही अंतरावर गेले असतांना बिबट्याने वासरावर हल्ला करण्याचा प्रयत्न केला. मात्र तेथे असलेल्या कुत्र्याने जोराने भुंकण्यास सुरवात केली. त्यानंतर बिबट्याने कुत्र्याच्या मानेलाच पकडले. हा प्रकार लक्षात आल्यानंतर पानपट्टे यांनी आरडा ओरड करून दगडफेक केली. त्यामुळे बिबट्याने तेथून पोबारा केला. बिबट्याच्या हल्ल्यात कुत्र्याच्या मानेला गंभीर दुखपत झाली आहे.

सदर प्रकार माजी पंचायत समिती सदस्य राहूल उर्फ पिंटू पतंगे यांनी वन विभागाला कळविला. तसेच घटनास्थळावरील बिबट्याच्या पायाच्या ठश्‍याचे छायाचित्र देखील पाठविले आहे. वन विभागाच्या कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी पाहणी केली आहे. आता या ठिकाणी तातडीने ट्रॅप कॅमेरे बसवून तो बिबट्या आहे का तडस याचा सोक्षमोक्ष लावावा अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.

बातम्या आणखी आहेत...