आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नशेच्या गोळ्या:नायट्रोसन नशेच्या गोळ्यासंबंधी शरयू रुग्णालयाच्या लेटर पॅडची चौकशी होणार; दोघांना कोठडी

औरंगाबाद21 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

शहानूरमिया चौकात अवैधरीत्या नशेच्या गोळ्या (बटन) विक्री करणाऱ्या राम धोंडू काळे (४५), एपीआय कॉर्नरजवळील ठाकरेनगरातील घरातून नशेच्या औषधींची विक्री करणाऱ्या दिनेश साहेबराव हावळे (५८) या दोघांना एनडीपीएसच्या विशेष पथकाने गुरुवारी बेड्या ठोकल्या. दोन्ही आरोपींकडून पथकाने एकूण ६०० नशेच्या गोळ्या जप्त केल्या. शहर पोलिस आयुक्तालयाच्या गुन्हे शाखेअंतर्गत असलेल्या अंमली पदार्थविरोधी कृती पथक (एनडीपीएस) ने ही कारवाई केली. एनडीपीएसच्या पथकाला शहानूरमिया दर्गा चौक परिसरात नशेची औषधी विक्री होत असल्याची माहिती मिळाली. त्याआधारे पथकाने राम धोंडू काळे (४२, रा. न्यू उस्मानपुरा, श्रेयनगर) यास अटक केली. पथकाने त्याच्याकडून ४५ नायट्रोसनच्या गोळ्या जप्त केल्या. राम काळेला गोळ्या कोठून आणल्या याबाबत विचारणा केली असता त्याने दीपक हावळेकडून खरेदी केल्याची माहिती दिली. त्यानुसार पथकाने दीपक हावळेच्या घरावर छापा मारला. त्याच्या ताब्यातून ५५५ नग नायट्रोसन १० च्या गोळ्या व ४८० रुपये रोख रकमेसह एक धारदार हत्यार असा मुद्देमाल जप्त केला. दीपक हावळे (एमएच २० एफयू ८०८६) चारचाकीतून नशेचा व्यापार करीत होता. या प्रकरणात एनडीपीएसचे सहायक फौजदार नंदकुमार भंडारे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून उस्मानपुरा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. या दाेन्ही आरोपींना न्यायालयात हजर केले असता, सहायक सरकारी वकील जयमाला राठोड यांनी आरोपीच्या घरातून सापडलेल्या शरयू हॉस्पिटलच्या लेटरपॅडबाबत तपास करणे बाकी असल्याने कोठडीची विनंती केली. त्यानुसार प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी एस. एस. छल्लानी यांनी १३ जूनपर्यंत पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले.

बातम्या आणखी आहेत...