आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

प्रियकरानेच दाबला विवाहितेचा गळा:शिऊर येथे टँकमध्ये आढळला मृतदेह, अनैतिक संबंधातून प्रकार घडल्‍याचा पोलिसांना संशय

शिऊर2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

शिऊर येथे टँकमध्ये संशयास्पद आढळलेला पंचवीस वर्षीय महिलेचा मृतदेह आणि त्यामागील प्रकरणाला बुधवारी वेगळीच कलाटणी मिळाली. मृत महिलेची पैशांची मागणी वाढल्याने प्रियकरानेच गळा घोटल्याची बाब पुढे आली. आरोपीला शिऊर पोलिसांनी ताब्यात घेत न्यायालयात हजर केले असता ४ दिवसांची कोठडी सुनावली आहे.

शिऊर येथे माया आगलावे या महिलेचा मृतदेह तिच्या घराच्या मागील सेप्टिक टँकमध्ये पाण्यात बुडालेल्या अवस्थेत असल्याची माहिती सोमवारी सायंकाळी मृत मायाच्या आईने शिऊर पोलिस ठाणे गाठून दिली होती. त्यानुसार संशयित पती दादासाहेब आगलावे यास शिऊर पोलिसांनी चौकशीसाठी तत्काळ ताब्यात घेतले होते. मात्र मी खून केला नाही हेच चौकशीदरम्यान तो सांगत होता. तांत्रिक तपासाच्या आधारे शिऊर पोलिस बुधवारी ज्ञानेश्वर बबन आगलावे या तरुणापर्यंत पोहोचले. ज्ञानेश्वरला पोलिसांनी ताब्यात घेत चौकशी केली असता मायासोबत ज्ञानेश्वरचे सहा महिन्यांपासून अनैतिक संबंध होते.

बातम्या आणखी आहेत...