आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
 • Marathi News
 • Local
 • Maharashtra
 • Aurangabad
 • The Lover Who Cut His Girlfriend To Pieces Prepared A Plan With A Cold Head. Read How Did He Commit The Murder? A Friend Was Also Taken Along; Finally Had To Eat Jail Air!

औरंगाबादच्या कोल्ड ब्लडेड मर्डरची कहाणी:प्रेयसीच्या मृतदेहाचे केले तुकडे, मित्राची घेतली मदत; आरोपी सौरभ लाखेला पोलिस कोठडी

औरंगाबाद4 महिन्यांपूर्वी
 • कॉपी लिंक
 • संशयित मारेकऱ्यासह साथीदाराला 23 ऑगस्टपर्यंत पोलिस कोठडी

औरंगाबाद जिल्ह्यातील शिवूर आणि पंचक्रोशित नावाजलेल्या सौरभ लाखेने आपण विवाहित आहोत याचे भान न ठेवता, दुसऱ्या विवाहितेसोबत प्रेमसुत जुळवले. अधूनमधून तो तिला भेटायचा, पण प्रेयसीच्या घरोबा करण्याचा हट्टानेच तिचा जीव गेला. डोक्यावरुन पाणी जात असल्याने तोही वैतागला अन् तिला मारण्यासाठी त्याने थंड डोक्याने प्लॅन रचला. यासाठी सौरभने तीन साथीदारांनाही हाताशी धरले.

तरुणीच्या शरिराच्‍या खांडोळ्या करुन विल्हेवाट लावण्‍याचा प्रयत्‍न केल्याप्रकरणी मुख्य संशयित सौरभ बंडु लाखे (31) याच्यासह सहआरोपी म्हणून सुनील गंगाधर धनेश्वर (25, दोघे रा. शिऊर ता. वैजापुर), मन्‍वर उस्‍मान शहा (रा. शिऊर ता. वैजापुर) यांच्यावर खुनाचा गुन्हा नोंदवण्यात आला. यात सौरभ आणि सुनील यांना अटक झाली. पोलिसांनी त्यांना ताब्यात घेत चौकशी केली तेव्हा त्यांच्याकडून खुनाचा घटनाक्रमच उलगडला.

असा रचला कट

अंकिता श्रीवास्तव या तरुणीसोबत सौरभचे प्रेम जुळले. हि बाब सासरी, माहेरी कुटुंबियांना समजल्यानंतर पतीला सोडून ती राहु लागली. तिने औरंगाबादेतील हडकोत एक खोली भाड्याने घेत स्पर्धा परीक्षेची तयारी सुरु केली. सौरभ आणि अंकिता एकमेकांना भेटत होते, पण लग्न करावे म्हणून ती खूपच मागे लागल्याने सौरभ हतबल झाला. त्याचाही विवाह झाला असल्याने त्याची मोठी अडचण झाली होती, म्हणून त्याने अंकिताचा काटा काढण्यासाठी थंड डोक्याने आधी प्लॅन रचल्याचे समोर आले आहे. अटकेत असलेला सौरभ लाखे आणि सुनील धनेश्वरची चौकशी केली असता हा घटनाक्रम समोर आला.

हा आहे घटनाक्रम

 • ​​​​​सौरभ लाखे व अंकिता यांच्‍यात लग्न करण्यावरुन सतत भांडण सुरु होते. अंकिताने लग्नासाठी सौरभकडे तगादा लावत, लग्न कर नाहीतर तुझ्या घरी येवून राहते अशी धमकी दिली होती.
 • 15 ऑगस्‍ट रोजी सकाळी साडेआठ वाजेच्‍या सुमारास संशयित सौरभ व त्‍याचा साथीदार मन्‍वर शहा यांनी कट रचून अंकिताचा हाताने गळा दाबुन तिचा खून केला. त्‍यानंतर खोलीला बाहेरुन कुलूप लावून तो शिऊरला गेला.
 • 16 ऑगस्‍ट रोजी दुपारी एक वाजेच्‍या सुमाराम सौरभ अंकिताच्‍या घरी आला व त्‍याने अंकिताचे मुंडके, डावा हात कापून सायंकाळी पिशवी मध्‍ये भरुन दुचाकीवरुन शिऊर गाठले. याच दिवशी सायंकाळी एका फर्निचरच्‍या गोडाऊनमध्‍ये हे अवयव त्याने लपवून ठवले.
 • 17 ऑगस्‍टला सकाळी साडेदहा वाजेच्‍या सुमारास सौरभ त्‍याचा साथीदार सुनिल धनेश्वर कारने अंकिताच्‍या घरी आले. अंकिताचे मुंडके आणि हात नसलेले धड कारध्‍ये टाकून ते जाळण्‍यासाठी शिऊरला घेवून जाण्याचा त्यांचा प्लॅन होता पण शेजाऱ्यांनी पाहताच त्यांचे बिंग फुटले.
 • आपल्या हातून मोठा अनर्थ झाल्याचा पश्चतापही सौरभला झाला. विंवचनेतूनच त्याने 17 ऑगस्टला त्याने एका व्हाॅट्सअ‌ॅप ग्रुपवर होय मी खुन केला अशी जाहिर कबुली देत स्वःतला पोलिसांच्या स्वाधीन केले.

22 ऑगस्टपर्यंत पोलिस कोठडी

संशयित सौरभ लाखेसह अन्य एका संशयित आरोपींना आज न्‍यायालयात हजर करण्‍यात आले असता​​​​​​ प्रथम वर्ग न्‍यायदंडाधिकारी एम.एम. माळी यांनी गुरुवारी (ता. 18) 23 ऑगस्‍टपर्यंत पोलिस कोठडीत ठेवण्‍याचे आदेश दिले.

या बाबींचा होणार तपास

न्यायालयात सहायक सरकारी वकील जरीना दुरार्णी यांनी गुन्‍हा करतेवेळी आरोपींनी परिधान केलेले कपडे, गुन्‍ह्यात वापरलेली दुचाकी हस्‍तगत करायची आहे. संशयित आरोपींचा पसार तिसरा साथीदार मन्‍वर शहा याला अटक करायची आहे. गुन्‍ह्यात आणखी कोणाचा सहभाग आहे काय, गुन्‍ह्याचे खरे कारण काय आहे याचा तपास बाकी असल्याने आरोपींना पोलिस कोठडी देण्‍याची विनंती न्‍यायालाकडे केली. हि विनंती न्यायायाने मान्य केली असून आता पोलिस या प्रकरणी तपास करीत आहेत.​

बातम्या आणखी आहेत...