आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

मराठा आरक्षण:औरंगाबादेत 8 ऑक्टोबर रोजी महाऐक्य परिषद, एकाच छताखाली आंदोलनाची दिशा ठरवणार

औरंगाबाद7 महिन्यांपूर्वीलेखक: संतोष देशमुख
  • कॉपी लिंक
  • मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने दोन्ही छत्रपतींना, राजकीय, विनाराजकीय मराठा लोकनेत्यांना उपस्थित राहण्याचे आवाहन

राजकीय षडयंत्रामुळे मराठा समाजावर सातत्याने अन्याय होत आहे. यामुळे तरुण मुलांच्या मनावर गंभीर परिणाम झाले असून ते आत्मबलिदान करत आहेत. कालच बीड जिल्ह्यातील विवेक राहाडे या युवकाने नैराश्यापोटी आत्मबलिदान दिले. असे किती दिवस चालायचे. वेगवेगळे आंदोलने केल्यापेक्षा आता एकाच वेळी सोक्षमोक्ष लावण्यासाठी आंदोलनाची दिशा ठरवणे अनिवार्य आहे. त्यासाठी सर्वानुमते निर्णय घेणे व सर्वांना एक करून निर्णय घेण्यासाठी ८ ऑक्टोबर रोजी मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने महाऐक्य परिषद आयोजित करण्यात आली आहे. दोन्ही छत्रपतींनी, राजकीय नेत्यांनी पक्षाचे जोडे काढून व विनाराजकीय लोकनेत्यांनी, विविध संघटना पदाधिकाऱ्यांनी आपसाआपसातील मतभेद विसरून परिषदेला उपस्थित रहावे, असे आवाहन मराठा समन्वयक चंद्रकांत भराट यांनी शुक्रवारी पत्रकार परिषदेत बोलताना केले.

सकल मराठा समाज गत ३० वर्षांपूर्वी पासून आपल्या न्याय मागण्यांसाठी लढा देत आहे. त्याकडे सरकारने व मराठा नेत्यांनी अक्षम्य दुर्लक्ष केले आहे. कोपर्डीच्या अमानुष घटनेनंतर ९ ऑगस्ट क्रांती दिनानिमित्त संपूर्ण मराठा समाज एकत्रित औरंगाबादेत एकत्रीत येऊन मुक मोर्चा काढून सर्वांचे लक्ष वेधले होते. यानंतर सातत्याने ५८ मोर्चे शांततेत काढली. सरकारने खोटे आश्वासने दिली. यामुळे युवक तरूण नैराश्यात गेलेल्या ४२ तरुणांनी आत्मबलिदान दिले. मराठा समाजातील तरुणांना आरक्षणाची नितांत गरज असल्याची चिठ्ठी त्यांनी लिहून ठेवलेली आहे. गायकवाड आयोगाने मराठा समाज मागास असल्याचे आपल्या अहवालात नमुद केलेले आहे. राज्य सरकारने व उच्च न्यायालयात आरक्षण आबाधित ठेवले. मा़त्र राजकीय शुक्लकाष्ठ काही संपता संपत नाही. सर्वाेच्च न्यायालयात आरक्षणास स्थगिती मिळाली. यामुळे गरीब विद्यार्थ्यांना शिक्षण कसे पूर्ण करावे, असा यक्ष प्रश्न निर्माण झालेला आहे. याच विवंचनेत विवेकने चिठ्ठी लिहून आत्मबिलदान दिले. हाच एक प्रश्न नाही अनुर्तीत नाही तर कोपर्डी प्रकरणातील आरोपींना आद्याप फाशी झालेली नाही. आंदोलकांवरील गुन्हे मागे घेण्यात आलेले नाही. सारथी कुचकामी ठरत आहे. अण्णासाहेब आर्थिक विकास महामंडळाकडे अर्जांचा महापुर असून लाभ जेमतेम मिळतोय, वस्तीगृहांचा प्रश्न, ४२ तरुणांच्या कुटुंबातील एकाला नोकरी व १० लाखांची मदत दिलेली नाही, असे सर्वच प्रश्न जैसे थे आहेत. सरकार कोणते आहे हे महत्त्वाचे नाही, सर्वांनी खोटी आश्वासने दिली व मराठा समाजाची शुद्ध फसवणूक करून त्यांना खाईत लोटण्याचे काम केले आहे. असे किती दिवस चालायचे. हे कुठे तरी थांबले पाहिजे. त्यासाठी ठिक ठिकाणी आंदोलन केल्यापेक्षा आता एकदाच आंदोलन करण्यासाठी सर्वांनी एकत्रित यावे. त्यासाठी आपआपल्या पक्षांचे जोडे बाहेर काढून, गटतट विसरून मराठा समाजाच्या भल करण्यासाठी सर्वांनी महाऐक्य परिषदेला एकत्रित यावे. असे आवाहन भराट यांनी केले आहे. या वेळी अभिजित देशमुख, सतीश वेताळ, डॉ. शिवानंद भानुसे, सुरेश वाकडे पाटील, रेखा वाहटुळे, शिवाजी जगताप, रमेश गायकवाड, सुकन्या भोसले, नितीन देशमुख, योगेश औताडे, संतोष तांबे, प्रदिप हारदे, बाबासाहेब औताडे, अजय गंडे, अनिल बोरसे आदी उपस्थित होते.

नेतृत्व कुणीही करावे, आम्ही त्यांच्या पाठिमागे

दोन्ही छत्रपतींनी पुढाकार घ्यावा अथवा कोणत्याही पक्षाच्या नेत्याने समोर येऊन न्याय मिळेपर्यंत मराठा समाजाचे नेतृत्व करावे. महाऐक्य परिषदेत तशी त्यांनी आपली भुमिका मांडावी, सर्वानुमते सर्व समाज त्यांच्या पाठिमागे उभा राहिल. तरुण मावळे त्यांच्या एका हकेवर आंदोलनाचा ध्वज खांद्यावर घेऊन मार्गस्थ होईल, एवढच नव्हे तर आता सकल मराठा समाज संपूर्णपणे जेथून आहे तेथून आंदोलनात सहभागी होण्यासाठी तयार झाला आहे, त्याला योग्य आकार देण्यासाठी ही परिषद होत असल्याचेही भराट, सतीश वेताळ, अभिजित देशमुख, सुरेश वाकडे पाटील, डॉ. भानुसे म्हणाले.

सर्व संघटनांना आवाहन

मराठा क्रांती मोर्चा, मराठा क्रांती ठोक मोर्चा बरोबरच सर्व मोठ्या व छोट्या संघटनांनी एकत्रित यावे व समाजहितासाठी आता निर्वाणीचा एकच लढा मराठा समाजाचा प्रश्ना सोडवा, यासाठी महाऐक्य परिषदेला यावे, असेही सर्व समन्वयकांनी आवाहन केले आहे.

अहिंसात्मक आंदोलन

मराठा आरक्षण स्थगिती मागे घ्यावी, नीट परीक्षेत मराठा मुलांना आरक्षणाचा लाभ मिळावा, एमपीएससी, युपीएसचे अर्ज भरलेल्या सर्व उमेदवारांना आरक्षण कोट्यातूनच पुढील सर्व प्रक्रिया पार पाडावी, जे भरती झाले आहेत त्यांना तातडीने सामावून घ्यावे, जोवर मराठा आरक्षणाचा प्रश्न निकाली लागत नाही तोवर सर्व प्रकारच्या भरत्या रद्द कराव्यात, विवेक रोहाडे या युवकाच्या कुटुंबियाला २५ लाखाची मदत जाहीर करावी महिला संरक्षण बाबतीत केंद्र सरकार गंभीर नाहीय, त्यामुळे महिला संरक्षणाचा कायदा आणावा, नाहीतर आम्हाला रस्त्यावर उतरावं लागेल, अशा विविध मागण्यांसाठी युवा मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने २ ऑक्टोबर रोजी महात्मा गांधी जयंती निमित्त जिल्हाधिकारी कार्यालयासमोर शांततेत आंदोलन करून जिल्हाधिकारी यांना निवेदन सादर करण्यात आले. या वेळी ऍड सुवर्णा मोहिते, विकीराजे पाटील, नितीन कदम, गणेश गलांडे,लक्ष्मण मिड, सोनू चौबे, शुभम देशमुख,चेतन डाखोरे,निलेश मालोदे,वैभव बोडखे, कल्पना निकम,यांची उपस्थिती होती.

बातम्या आणखी आहेत...