आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कर्तव्यात कसूर:कर्जवाटपात निष्काळजीपणा व्यवस्थापकास भोवला; गुन्हा रद्दची याचिका फेटाळली

छत्रपती संभाजीनगर21 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

कर्जवाटप प्रकरणात लाभार्थींच्या कागदपत्रांची शहानिशा न करता कर्तव्यात कसूर करून फसवणूक केल्याप्रकरणी दाखल गुन्हा रद्द करण्याची विनंती करणारी याचिका खंडपीठाचे न्या. अनुजा प्रभुदेसाई व न्या. आर. एम. जोशी यांनी फेटाळली.वसंतराव नाईक विमुक्त जाती व भटक्या जमाती विकास महामंडळाकडून लाभार्थींना राज्यभरात विविध व्यवसायांसाठी कर्ज वाटप केले जाते. या महामंडळाच्या लातूरच्या कार्यालयात सूर्यकांत राठोड यांनी पाच लाख रुपयांचे कर्ज घेतले. कर्जदार उदगीर तालुक्यातील कै. प्रकाश कांबळे माध्यमिक आश्रमशाळा डोंगरशेळकी येथे लिपिक पदावर कार्यरत होते.

तरीही सुशिक्षित बेरोजगार असल्याचे खोटे उत्पन्नाचे प्रमाणपत्र सादर करून महामंडळ व शासनाची फसवणूक केली. कर्जदार खासगी नोकरी करीत नसल्याचे सांगून दुग्ध व्यवसायाकरिता पाच लाख रुपयांचे कर्ज घेऊन कर्ज रकमेचा एकही हप्ता भरला नाही. मूल्यांकनाचे काम चालू असताना हा प्रकार उघडकीस आला. महामंडळाचे तत्कालीन जिल्हा व्यवस्थापक दादासाहेब गणपती जाधव यांनी कर्जदारांच्या कागदपत्रांची शहानिशा न करता कर्ज फाइलवर योग्य ठिकाणी स्वाक्षरी न करता, कर्जदाराशी संगनमत करून महामंडळाचे आर्थिक नुकसान केले.

फसवणूक केली आणि सेवेत कसूर केल्याचा ठपका ठेवत त्याच्याविरुद्ध लातूरच्या पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला. भादवि कलम ४२०, ३४ नुसार गुन्हा रद्दसाठी फाैजदारी याचिका दाखल केली. याचिका अंतिम सुनावणीस निघाली असता याचिकाकर्त्याने कर्तव्यात कसूर करून महामंडळाचे आर्थिक नुकसान केल्याची बाब अॅड. डी. बी. पवार पाथरेकर यांनी निदर्शनास आणून दिली. संबंधित याचिका अॅड. तुकाराम व्यंजने यांनी मागे घेण्याची विनंती खंडपीठाकडे केली.

बातम्या आणखी आहेत...